विषय नसतानाही चर्चा करणे
रोजचं मित्र- मैत्रीणींसह गप्पांची मैफल जमवणे
खरंच सांगते तुझ्यासोबत पुन्हा एकदा मी बालपण जगले
कोणालाही आपण चिडवायचो
प्रत्येकालाच नवीन ओळख द्यायचो
सारं दु:ख विसरत मोठ्याने हसायचो..
खरंच सांगते तुझ्यासोबत पुन्हा एकदा मी बालपण जगल े
माझ्यापासून तू कधीही दुर होऊ नये
एकामेकांशी आपणं कधी काही लपवू नये
माझ्या प्रेमाचा विसर कधीही पडू नये
कारण,
खरंच सांगते तुझ्यासोबत पुन्हा एकदा मी बालपण जगले