suvichar

केजरींची टाळाटाळ

गुरूवार, 13 मार्च 2014 (15:48 IST)
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल सध्या पत्रकारांपासून दूर पळत आहेत. माध्यमांना विशेषत: वृत्तवाहिनंना ‘मॅनेज’ केल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर झाल्यापासून त्यांची पंचाईत झाली आहे. एका मुलाखतीमधील कोणता भाग दाखवायचा आणि कोणता मुद्दा ‘हायलाईट’ करायचा यबाबत केजरीवाल मुलाखत घेणार्‍यास मार्गदर्शन करतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. जसपाल भट्टी यांच्या पत्नीने ‘आप’चे तिकीट नाकारले आहे. कुमार विश्वास तिकीट वाटप प्रक्रिेयावर नाराज आहेत. शाझिया इल्मी यांनी सोनिया  गांधी यांच्याविरूद्ध निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. या सार्‍या घडामोडींमधून ‘आप’ इतर पक्षांप्रमाणेच असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
मुंबईपर्यंत विमानाने आलेल्या केजरीवाल यांनी मुंबईत रिक्षाने आणि अंधेरी ते चर्चगेट हा प्रवास लोकलने करण्यामागे कोणता हेतू दडलेला आहे, याचीही आता चर्चा होत आहे. नरेंद्र मोदी यांचा विमानाचा खर्च कोण करत आहे, असा सवाल करायचा आणि अहमदाबाद-जयपूर हा प्रवास विमानातून करायचा अशा प्रकारांमुळे केजरींचे पितळ उघडे पडत आहे. केजरीवाल यांच्या रिक्षा प्रवासात आम आदमीचे सहा कार्यकर्ते एकाच रिक्षातून प्रवास करताना आढळून आले आहे. सिग्नल तोडून केजरीवाल यांचा रिक्षा प्रवास झाला आहे. केजरीवाल ज्या  डब्यात बसले होते त्यामध्ये ‘आप’चे कार्यकर्ते इतर चाकरमान्यांना चढूच देत नव्हते. डबा अर्धा रिकामा असूनही आपच्या अरेरावीमुळे सामान्या मुंबईकरांचीच कोंडी झाल्याचे स्पष्ट झाले. केजरीवाल मुंबईत आणि त्यांचे गुरू अण्णा हजारे दिल्लीत असा प्रकार बघायला  मिळाला.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे खरे स्वरूप समोर येत आहे. आम आदमी पक्षातही धुसफूस सुरू झाली आहे. गेल्या वर्षभरात ज्या वेगाने ‘आम आदमी’ हा अतिशय चर्चेतला आणि चलनी शब्दप्रयोग झाला असला तरी या पक्षाची अधोगतीही वेगाने होत असल्याचे दिसत आहे. एकेकाळी वृत्तवाहिन्यांवर सातत्याने झळकणार्‍या केजरीवाल यांना सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिापासून दूर राहावे लागत आहे. सुशासन देण्याच्या घोषणा करणार्‍या आम आदमी पक्षाचा प्रत्यक्ष प्रवास फारसा सुखकारक होत नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मध्य रेल्वे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलरी शोरूम लुटले, गोळीबार करून गुन्हेगार फरार

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

बारमाही उत्पन्न देणारे फळपीक; चिकू लागवड

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

Show comments