Dharma Sangrah
✕

गांधीजींचे गाव आणि नरेंद्र मोदी

Updated: मंगळवार, 6 मे 2014 (13:12 IST)
गांधीजींनी कराडी गावातच आपले कायमस्वरुपी निवासस्थान बनवले होते. या गावची लोकसंख्या जवळपास 1300 आहे. गावातील 75 टक्के लोक परदेशी रहिवाशी आहेत. युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिका अशा विविध देशांतून आलेले लोक याठिकाणी राहतात. मोठमोठे बंगलेदेखील याच लोकांचे आहेत. अधूनमधून दोन-तीन महिन्यांसाठी ते या गावात येऊन राहतात. गावात 24 तास वीज आहे. इथल्या दुकानांमधून बंद बाटलीतून पाणी विक्री होते. गावातील रस्ते पक्के आहेत. गावात मोठी टाकी असून त्यामधून घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. वीज, पाणी आणि रस्ते सरकारच्या निधीतून झाले आहेत. इतर सर्व खर्च गावच्या निधीतून भागवला जातो. या गावातील प्रत्येक घरात पक्की शौचालये बांधलेली आहेत. गांधीजींच्या विचारांवर चालणारी मोठी शाळा या गावात आहे. या शाळेत इंग्रजी आणि गुजराती माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जाते. शाळेसाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा सर्व पैसा परदेशातील लोकांनी पाठविला आहे. इंग्रज राजवटीपूर्वी या ठिकाणचे लोक यंत्राविना चालणारी नाव बनवत होते.

महात्मा गांधीजी 1893 मध्ये आफ्रिकेला गेले होते परंतु कराडी गावातील काही लोक त्यापूर्वी म्हणजे 1875 मध्येच आफ्रिकेत जाऊन आले होते. 1920च्या दशकात कराडी गावात पहिली राष्ट्रीय शाळा सुरू करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल या शाळेचे अध्यक्ष होते. इथले लोक पहिल्यापासूनच व्यापारी प्रवृत्तीचे आहेत. शिक्षणाने त्यांच्यासाठी नवे मार्ग निर्माण केले. त्यामुळे ते जगभर पोहोचले. विदेशातील लोकांच्या पैशावर जेव्हा याठिकाणी पहिली राष्ट्रीय शाळा उभारण्यात आली तेव्हा त्याचे उद्घाटन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले होते.

16 व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण भारतात नरेंद्र मोदींविषयी जी सहानुभूती पाहायला मिळते ती कराडी गावातदेखील दिसते. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत, असे येथील लोकांना वाटते. विकासाच्या सर्व योजना या गावात यापूर्वीच पोहोचल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नसल्याचे येथील लोक सांगतात. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक गुजराती नेता ‘7 रेसकोर्स’ च्या शर्यतीत असल्याचे येथील लोकांना अप्रूप वाटते. एक गुजराती माणूस पंतप्रधान होत असेल तर आपल्याला यापेक्षा अधिक काही नको, असे येथील लोक बोलतात. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वात गेल्या ही वर्षापासून खूप मोठा बदल झाला आहे. कदाचित ते महात्मा गांधीजींच्या मानवतावादी विचाराकडे वळतील आणि देशाचे कल्याण करतील असेही येथील लोकांना वाटते. सर्वाना सोबत घेऊन पुढे जाण्याचा मानवतावादी रस्ता हाच सर्वात चांगला मार्ग आहे. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान बनले तर त्यांना याच मार्गाने जावे लागेल.  

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

६ वर्षांच्या मुलाचा ११ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आईचे अवघ्या १५ दिवसांपूर्वीच झाले होते निधन

मुंबई: कुर्ल्यात जोडप्यावर हल्ला झाल्यानंतर बीएमसीची कारवाई, उद्यानांमध्ये एमएसएफ जवान तैनात होणार

पालघर जिल्ह्यात ट्रकसोबत मोटारसायकलची भीषण धडक, तिघांचा मृत्यू

शरद पवार यांच्या निवृत्ती अफवांवर सुप्रिया सुळे यांचे सडेतोड उत्तर, म्हणाल्या....जनता निर्णय घेईल

महाराष्ट्रात परीक्षेतील गैरप्रकारांसाठी १० कोटी रुपयांचा दंड तर पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिफारस

Show comments