Dharma Sangrah
✕

दिनचर्या नरेंद्र मोदींची

Updated: शनिवार, 3 मे 2014 (14:46 IST)
नरेंद्र मोदी कधीही कोणतेही थंड पेय घेत नाहीत. सतत भाषणे करावी लागत असल्यामुळे घसा   व्यवस्थित राहावा याची ते काळजी घेतात. ते नेहमी कोमट पाणी पितात. कधी-कधी घसा तंदुरुस्त राहण्यासाठी आयुर्वेदिक औषधेही घेतात. कडक उन्हातही मोदींनी गेल्या एक महिन्यापासून जाहीर सभांमध्ये भाषणे केली आहेत. निवडणूक प्रचाराचवेळी नरेंद्र मोदी स्थानिक मुंद्यावर अधिक भर देतात. यासंदर्भातली माहिती त्यांचे सहकारी एका कागदावर गुजराती भाषेत लिहून देतात. नरेंद्र मोदींनी खास निवडणुकीसाठी आयटी झालेल्या मुलांची टीम तयार केली आहे. या टीममधील सदस्य सर्व माहिती अद्यावत ठेवतात. गरज पडेल तेव्हा ही मोदींपर्यत पोहोचविली जाते. सोशल मीडियावर येणार्‍या प्रतिक्रिया मोदी स्वत: वाचून त्यांना उत्तरेही देतात. 

नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत 3 लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. 5 हजार 827 निवडणूक रॅली, कार्यग्रम आणि रोड शो च्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला आहे. गेल्या वर्षी 15 सप्टेंबर रोजी हरियाणातील रेवाडीमध्ये माजी सैनिकांच्या एका सभेत केलेल्या भाषणाने त्यांच्या अभिानाची सुरुवात झाली असून ती येत्या 10मे पर्यंत चालणार आहे. नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत 25 राज्यात 437 जाहीरसभा घेतल्या आहेत. याशिवाय थ्रीडी या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 1350 सभेतून लोकांशी संवाद साधला आहे. 1 ते 10 मे   दरम्यान ते याच माध्यमातून आणखी 600 सभा घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात त्यांनी 4 हजार ‘चाय पर चर्चा’ हा कार्यक्रम घेतला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोदी यांनी 21 राजत 38 जाहीर सभेतून एक कोटी लोकांशी संपर्क साधला आहे. प्रचाराच्या दुसर्‍या टप्प्यात त्यांनी 196 भारत विजय रॅली काढली आहे. याच टप्प्यात 241 सभांमधून त्यांनी 5 ते 10 कोटी लोकांशी संवाद साधला आहे.

नरेंद्र मोदी यांचा दिवस खूप मोठा असतो. झोपण्यासाठी त्यांना फक्त चार तासाचा अवधी मिळतो. रात्री एक वाजल्यानंतर ते झोपण्यासाठी जातात आणि पहाटे पाच वाजता त्यांची दिनचर्या पुन्हा एकदा सुरू होते.

जयप्रकाश अभंगे

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ साठी पशुसंवर्धन योजना सुरू केल्या

सरपंच बनण्याची इच्छा, पण जागा महिलांसाठी राखीव...४२ वर्षीय ऑटो चालकाची आत्महत्या

मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील लाखो प्रवाशांना फायदा होणार; मुंबई वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढून ३१० झाली; पाणीटंचाई निवारणासाठी ४८८ कोटी रुपयांना मंजुरी

पीएफ नियमांमध्ये मोठा बदल, आता वयाच्या ५५ ​​वर्षांपूर्वी २ महिन्यांच्या आत खात्यातून ९०% निधी काढता येईल

Show comments