Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बटन दाबले की मत भाजपलाच?

Updated: शुक्रवार, 4 एप्रिल 2014 (09:36 IST)
 
आसाममधील जोरहाट लोकसभा मतदारसंघात पाठवलेल्या मतदान यंत्रांमध्ये हा घोळ झाला आहे. ही मतदान यंत्रे हैदराबादमधील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीने बनवली आहेत. जोरहाटमधील मतदान यंत्रांशी छेडछाड झाली आहे. ही मतदान यंत्रे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर उघडल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात ही यंत्रे सदोष आढळून आली. आता ही मतदान यंत्रे मतदान केंद्रावर पाठवण्यात येणार नाहीत, असे मुख्य निवडणूक अधिकारी विजेंद्र यांनी स्पष्ट केले. सदोष मतदान यंत्राबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच आसाममधील सर्व मतदान यंत्रांची फेरतपासणी करण्याची मागणीही केली आहे. जोरहाट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बिजॉय कृष्ण हांडीक आणि भाजपचे युवा नेते कामाख्या तासा यांच्यात मुख्य लढत आहे. हांडीक हे सातव्यांदा इथून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात 7 एप्रिलला मतदान होणार आहे.

 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनी कोणती पिके आणि कामे प्राधान्याने करावीत?

राजकारणातील आपल्या प्रवेशाबद्दलच्या अटकळांना अभिजीत दीपके यांनी पूर्णविराम देत केली मोठी घोषणा

LIVE: युवक काँग्रेस आणि एनएसयूआयने नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या निवासस्थानाला घेराव घातला

छत्रपती संभाजीनगरमध्ये, व्हॉट्सॲपवर संचालक असल्याचे भासवून २० लाख रुपयांची फसवणूक

Show comments