Marathi Biodata Maker

सीएम झाले पीएम!

Written By wd
Updated: मंगळवार, 27 मे 2014 (14:51 IST)
1995 मध्ये मोदींनी प्रशिक्षणाचा आगळावेगळा उपक्रम राबवला. राज्यात 28 हजार मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात पाच कार्यकर्ते म्हटले तरी किमान दीड लाख कार्यकत्र्यांना प्रशिक्षण द्यावे लागेल हे त्यांच्या लक्षात आले. अशा परिस्थितीत त्यांनी 10 हजार कार्यकत्र्यांना प्रशिक्षण दिले. या दरम्यान, मुरलीमनोहर जोशी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर या एकता यात्रेचे सारथ्य करण्याची संधी नरेंद्र मोदींना लाभली. त्याआधी लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेचेही नियोजन मोदींनी केले होते. या कामांमधून ते जनतेला माहीत झाले आणि त्यांना जनता काय आहे हे जाणता आले. 1995 मध्ये मोदींना भाजपच्या केंद्रीय कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांच्याकडे पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. या निमित्ताने त्यांना उत्तर भारताच्या राजकारणाचा फील मिळाला. मात्र त्यांच्या पश्चात गुजरातेत भाजपची लोकप्रियता कायम असूनही पक्षात दुफळी निर्माण झाली. त्यामुळे वाघेला बाहेर पडले. सरकार बरखास्त झाले आणि 1997 मध्ये मध्यावधी निवडणुका होऊन पुन्हा केशुभाई मुख्यमंत्री झाले. तिकडे दिल्लीत मोदी यांना पक्षाचे महासचिव करण्यात आले होते. राज्यात केशुभाई अपयशी ठरायला लागले होते. अशा परिस्थितीत 2001 मध्ये मोदींना अटलबिहारी वाजपेयी यांनी पाचारण केले आणि पुन्हा गुजरातेत जावे लागेल असे सांगितले. यानंतर त्यांना गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची संधी मिळाली.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी उद्योगांच्या विकासासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्याशिवाय देशातील तसेच परदेशातील अनेक मोठे उद्योजक आपला प्रकल्प गुजरातेत सुरू करण्याबद्दल उत्सुक असल्याचेही पाहायला मिळते. मोदी औद्योगिक विकासासाठी मोठय़ा तळमळीने प्रयत्न करत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा उद्योगसमूहाचा सिंगूरचा प्रकल्प रद्द होत आहे हे लक्षात येताच नरेंद्र मोदी यांनी टाटांशी चोवीस तासाच्या आत संपर्क साधला आणि टाटांनी हिरवा कंदील दाखवताच केवळ आठवडाभरात सानंद येथे 200 एकर जागा उपलब्धही करून दिली. मोदींनी दाखवलेली ही तत्परता काळाची खरी गरज आहे आणि ती मोदींनी अचूक ओळखली आहे. म्हणूनच भविष्याचा वेध घेऊन अचूक आणि प्रभावी पावले टाकणारा नेता अशी मोदींची प्रतिमा निर्माण झाली आहे. साहजिक त्यांचे पंतप्रधान होणे हा देशातील उद्योग क्षेत्रासाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या पाश्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील करिश्मा लोक अनुभवत आहेत. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुका मोदींभोवतीच खेळल्या जाणार हे उघड होते आणि झालेही तसेच. त्याचबरोबर या विकासपुरुषाला पंतप्रधानपद मिळण्याची जनतेशी इच्छाही आता फलद्रूप झाली.

स्वतंत्र कार्यभार व राज्यमंत्री - 
जनरल व्हि. के. सिंह - परराष्ट्र राज्यमंत्री
इंद्रजीत राव सिंह - नियोजन व संरक्षण राज्यमंत्री
संतोषकुमार गंगवार - संसदीय कामकाज, जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान राज्यमंत्री
श्रीपाद नाईक - सांस्कृतिक व पर्यटन
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम व नॅचरल गॅस
सरबानंदा सोनोवाल - युवक कल्याण व क्रीडा
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री 
जितेंद्र सिंह - विज्ञान व तंत्रज्ञान 
निर्मला सीतारामन : वाणिज्य व उद्योग मंत्री 
जी. एम. सिद्धेश्वरा - नागरी उड्डयन राज्यमंत्री
मनोज सिन्हा - रेल्वे राज्यमंत्री
निहालचंद - रासायनिक व खते राज्यमंत्री
उपेंद्र खुशवाह - ग्रामीण विकास व पंचायत राज राज्यमंत्री
राधाकृष्ण पी. - अवजड उद्योग राज्यमंत्री
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
कृष्णन पाल - दळणवळण राज्यमंत्री
डॉ. संजीव कुमार बलयान - कृषी राज्यमंत्री
मनसुखभाई वासवा - अदिवासी विकास राज्यमंत्री
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण, अन्न राज्यमंत्री
विष्णुदेव साई - खाण, रोजगार व कामगार राज्यमंत्री
सुदर्शन भगत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

Show comments