Festival Posters
✕

‘नमो’ची लोकप्रियता पोतरुगालमध्ये

Written By wd
Updated: सोमवार, 21 एप्रिल 2014 (10:50 IST)
 
सोशल मीडियावरील मजकुराचे विश्लेषण करणार्‍या ‘मेरुकी’ या संस्थेने केलेल्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाची ताकद सर्वच पक्षांनी ओळखली असून या माध्यमातून प्रचारावरही भर दिला आहे. राहुल गांधी यांचे इंटरनेटवरील पोस्ट इंग्रजी आणि हिंदीतील आहेत, तर मोदींचे ब्लॉग आठ भारतीय भाषांव्यतिरिक्त स्पॅनिश, चिनी, जपानी आणि रशियन भाषांमध्येही भाषांतरित केले जातात.
 
‘मेरुकी’ने 1 मार्च ते 17 एप्रिल या काळात सोशल मीडियावरील पोस्ट्सचा अभ्यास केला असता असे आढळून आले की, मोदींविषयीचे 1.5 लाख फीड इंग्रजी भाषेत होते, तर त्यापाठोपाठ 3,817 फीड पोतरुगीज भाषेत होते. राहुल यांच्यविषयीचे 44,991 फीड्स इंग्रजीमध्ये होते, तर 6,907 फीड इंडोनेशियन तर 4,956 इटालियन भाषेत असल्याचे समोर आले. तर आम आदमी पार्टीच्या बाबतीत मात्र इंग्रजीपाठोपाठ सर्वाधिक पोस्ट हिंदीभाषेतून असल्याचे आढळले, असे ‘मेरुकी’चे सहसंस्थापक ज्वलंत पटेल यांनी सांगितले.
 
भारतीय नेत्यांना परदेशात मिळत असलेल्या लाइक्स वा कमेंट्सच्या मागे ‘आउटसोर्सिग’ असण्याची शक्यता सोशल मीडियातील तज्ज्ञ फेटाळून लावत नाहीत. गेल्या वर्षी वरिष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत, अजय माकन आणि दिग्विजय सिंह यांचे सोशल मीडियावर परदेशात बरेच चाहते असल्याची बाब समोर आली होती. यामध्ये तुर्कस्तान, इंडोनेशिया, युक्रेन, रशिया यासारख्या देशांचाही समावेश होता. फेसबुक, गुगल प्लस, ट्विटर यावरील आपापल्या सोशल मीडिया पेजेसची लोकप्रियता वाढवण्याची कामगिरी परदेशातील ‘क्लिक ङ्खार्म्स’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गटांना दिली जात असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. या तिन्ही नेत्यांनी हे आरोप फेटाळले होते.
 
आकडे फुगवण्याचे कसब
 
अनेकदा लाइक्स, रिटिट्स, कमेंट्स आणि फेव्हरेट्सचा आकडा फुगवण्यासाठी खोटय़ा अकाउंटचा वापर करण्याचे काम राजकारण्यांच्या डिजिटल मार्केटिंग टीमकडून केले जाते. त्यामुळे या राजकारण्यांचे हॅशटॅग ढाका, इस्तंबुल, लिस्बन, जकार्ता आणि रोम यासारख्या शहरांमध्ये ‘ट्रेंड’मध्ये असल्याचे दिसते, असे मत ऑनलाइन प्रतिमा निर्मितीविषयीची सल्लागार कंपनी ‘व्हचरुअल सोशल ङ्कीडिया’चे सतीश आयझॅक यांनी व्यक्त केले. 
 
अलीकडच्या काळात ‘सोशलबझस्टोअर’ आणि ‘सोशल टायगर’ यासारख्या टूल्सआधारे सोशल मीडियावर आपले आकडे फुगवण्याचे काम केले जाते. शुल्क आकारून हे काम करणार्‍या एजन्सीही असतात.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

Show comments