suvichar

डाळ-ढोकळी

- स्मिता

ND
साहित्य : दोन वाट्या तुरीची डाळ, चार वाट्या कणीक, एक वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, चार-पाच ओल्या मिरच्या, आले, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हळद, चिंच, ओवा, धने, जिरे, गूळ, ओले खोबरे, कढीलिंब, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य, गोडे तेल.

कृती : तुरीची डाळ चांगली मऊ शिजवून घ्यावी. नंतर रवीने किंवा पळीने चांगली घोटून घ्यावी. नंतर त्यात आपल्याला हवे असेल तेवढे पाणी घालून ओल्या मिरच्या (उभ्या चिरून), आल्याचे बरीक तुकडे, चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट, चिंचेचे कोळलेले पाणी, गूळ (चवीप्रमाणे) व थोडी हळद घालावी. तसेच धन्या-जिऱ्याची पूड व थोडा गरम मसाला घालावा व चांगली उकळी आणावी. नंतर मेथी, मोहरी, हिंग, कढीलिंब व सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी व ती आमटीला द्यावी. नंतर कोथिंबीर व ओले खोबरे घालून उकळी आणावी.

कणीक व चण्याचे पीठ एकत्र करून, त्यात पिठाचा मुटका होईल, इतके तेलाचे मोहन घालावे. नंतर त्यात ओवा (वाटून), मीठ, लाल तिखट व हळद घालून व पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे. पीठ चांगले मळून त्याच्या पोळ्या लाटाव्यात व त्याचे शंकरपाळ्याच्या आकाराचे किंवा लांबट चौकोनी तुकडे कापून, ते वरील तयार केलेल्या उकळत्या आमटीत सोडावेत.

नंतर आमटीला थंड पाण्याचा हबका मारून व वर झाकण ठेवून ती मंद विस्तवावर थोडा वेळ ठेवावी. नंतर झाकण काढून आमटी पुन्हा चांगली शिजवावी. ही डाळ-ढोकळी गरम गरम अशी डिशमध्ये घालून जेवण्यात किंवा नुसतीच खावयास देतात. वर तूप घालावे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

हे आयुर्वेदिक काढे पावसाळ्यात तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतील

Relationship Tips: सुखी नात्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहे नातेसंबंध दृढ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

लघु कथा : मोर आणि बगळा; गोष्ट सौंदर्य आणि साधेपणाची

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

Show comments