रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

अरब राष्ट्रांची तहान भागविणार अंटार्क्टिकातील हिमनग

जगात अनेक देशांमध्ये पेयजलाची टंचाई भासत असते. जगातल्या सर्वाधिक 10 दुष्काळी भागात समावेश असलेल्या यूएई म्हणजे संयुक्त अरब अमिरातीला भेडसावत असलेल्या पाणी समस्येवर आबुधाबीतील एका कंपनीने अनोखा उपाय शोधला आहे. त्यानुसार 10 हजार कि.मी. असलेल्या अंटार्क्टिकातून प्रचंड हिमनग बोटीच्या सहाय्याने खेचून आणला जाणार आहे व तो वितळून बनलेल्या पाण्यापासून अरब राष्ट्रांची तहान भागविली जाणार आहे.

हा प्रकल्प 2018 मध्ये सुरू केला जात आहे; मात्र तो वाटतो तितका सोपा नाही.मिळालेल्या माहितीनुसार अंटार्क्टिकातून हिमनग अरब देशांच्या किनारपट्टीवर आणण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागेल. त्यानंतर तो हिमनग फोडून त्याचे तुकडे बॉक्समधून भरण्यात येतील. सूर्याच्या उष्णतेने बर्फाचे पाणी झाले की ते वेगळ्या टाक्यांतून साठविले जाईल व नंतर शुद्ध करून ते पिण्यासाठी वापरले जाणार आहे. 
 
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 1 प्रचंड हिमनगातून 20 अब्ज गॅलन पाणी मिळू शकते. अरब देशांची लोकसंख्या कमी असल्याने त्यांच्यासाठी हे पाणी पुरेसे होईलच; पण किनार्‍याजवळ हा हिमनग ठेवल्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढेल व त्यामुळे पावसाचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे. या देशात वर्षाला अवघा 100 मि.मी. पाऊस पडतो.