Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चित्ता वेगात नामशेष होण्याच्या मार्गावर!

Updated: गुरूवार, 29 डिसेंबर 2016 (11:11 IST)
 
सध्या असुरक्षित म्हणून गणल्या जाणार्‍या चित्याचे वर्गीकरण धोक्यात असलेला, चिंताजनक असे करणे आवश्यक आहे. चित्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या वतीने धोक्यात आलेल्या प्रजातींची यादी तयार करण्यात येते. त्यामध्ये चित्ता सध्या असुरक्षित या वर्गामध्ये आहे. त्याला आता चिंताजनक म्हणून गणना करण्याची आता वेळ आली आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.
 
चित्यांच्या ऐतिहासिक रहिवासापैकी आतापर्यंत 91 टक्के रहिवास संपुष्टात आला आहे. एकेकाळी संपूर्ण आफ्रिका आणि आग्नेय अशियामध्ये चित्यांचा रहिवास विस्तारलेला होता. चित्ता आशिया खंडातून तर आता अदृश्यच झाला आहे.
 
इराणमध्ये 50 पेक्षाही कमी संख्येने चित्ता अस्तित्वात आहे, असे प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या नियत कलिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन लेखात म्हटले आहे.
 
झिंबाब्बे देशात 1999 मध्ये 1200 चित्ते होते. ती संख्या 2015 मध्ये 170 एवढीच उरली. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील जमीन धारणा आणि इतर धोक्यांची गुंतागुंत वाढल्याने चित्त्यांवर हा विपरित परिणाम झाला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: गिरीश महाजन यांची नाशिकचे तर भरत गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती

Thorle Bajirao Peshwa पराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती

चंद्रपूरमध्ये दोन गाड्यांची भीषण धडक होऊन महिला पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू

गोंदियामध्ये भीषण अपघात, वाहनाची धडक बसल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू

₹300 मध्ये वर्षभरासाठी रिचार्ज करण्याचा त्रास आता संपला! 20 ऑगस्टपासून सबस्क्रिप्शन उपलब्ध; ₹299 चा प्लॅन सुरूच

पुढील लेख
Show comments