Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जर्मनीत धावली पहिली हायड्रोजन रेल्वे

Updated: सोमवार, 17 एप्रिल 2017 (11:28 IST)
 
त्यात डिझेल इंजिनचेच तंत्रज्ञान वापरले आहे. मात्र इंजिनची रचना आणि इंधन वेगळे आहेत. या रेल्वेत डिझेलऐवजी फ्यूएल सेल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन भरण्यात येतात. ऑक्सिजनच्या साहाय्याने हायड्रोजन नियंत्रित पद्धतीने जळत राहतो आणि त्या उष्णतेने वीज निर्माण होते. 
 
ही वीज लिथियम आयन बॅटरी चार्ज करते आणि रेल्वे धावू लागते. या रेल्वेतून धुराऐवजी वाफ आणि पाणी बाहेर पडते. ही रेल्वे बनविणार्‍या अलस्टॉमचे अधिकारी येंस स्प्रोटे यांच्या मते, ही नवी रेल्वे पारंपरिक डिझेल इंजिनच्या तुलनेत ६० टक्के कमी आवाज करते. ती पूर्णपणे उत्सर्जनमुक्त आहे. हिचा वेग आणि प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमताही डिझेल रेल्वेच्या समान आहे. एकदा हायड्रोजन भरल्यावर ही गाडी ६५० किलोमीटरचा प्रवास करू शकते. 
 
जर्मनीतील पाच राज्ये या कंपनीकडून अशा पाच रेल्वे विकत घेणार आहेत. डेन्मार्क, नॉर्वे, इंग्लंड आणि नेदरलँड यांनीही ही रेल्वे विकत घेण्यात स्वारस्य दाखवले आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

वाढदिवसाच्या पार्टीचा आनंद शोकात बदलला, नागपूरमध्ये कार अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

अखरे ठरलं! पुण्याच्या ५३ स्थळांचा प्रवास करणार्‍या Arrange Marriage Excel Sheet Groom ला मिळाली जीवनसंगिनी

सांगलीत दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक, दोन प्रवाशांचा मृत्यू तर १६ जण जखमी

Yamaha R2 २७ तारखेला लाँच होणार यामाहाची दमदार बाईक ; १०,००० रुपयांत बुकिंग सुरू.

श्रीलंकेत क्रिकेट सामन्यादरम्यान पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद; प्रशिक्षकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments