Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एच 1 बी: अमेरिकेचे निर्णय भारताला हानिकारक

Updated: गुरूवार, 27 एप्रिल 2017 (10:23 IST)
 
आम्ही सेवाक्षेत्रात एकूणच जगात जी निर्यात करतो त्यातील ५० ते ६० टक्के निर्यात ही अमेरिकेला होते. त्यामुळे एच १ बी व्हिसावर नियंत्रण आणणाऱ्या सुधारणा आम्हाला चिंतादायक वाटतात. पीटर्सन इन्स्टिटय़ूट येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की व्हिसा सुधारणा या जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ठीक आहेत, पण आम्हाला त्यावर नजर ठेवावी लागेल.
 
निर्यातवाढीत अडथळा ठरेल असे कोणतेही निर्णय हे भारतासाठी चिंताजनकच ठरतात. अमेरिकेच्या बाबतीत सांगायचे तर आम्ही एच १ बी व्हिसा निर्णयातील सुधारणांवर लक्ष ठेवून आहोत.
 
व्हिसाच्या बाबतीत आम्ही काही गोष्टी निभावून नेऊ शकतो. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एच १ बी व्हिसाचा मुद्दा अमेरिका भेटीत उपस्थित केला होता. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्यात एच १ बी व्हिसाच सुधारणा करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली असून, आता एच १ बी व्हिसाचा कंपनी व व्यावसायिकांना गरवापर करता येणार नाही. या निर्णयाचा परिणाम भारताच्या १५० अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगावर होणार आहे. एच १ बी व्हिसा व्यवस्थेत बदल करून अमेरिकी लोकांना रोजगार जास्त प्रमाणात मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात दिले होते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

वर्ध्यात स्कूल व्हॅन उलटली; अनेक विद्यार्थी जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक

आज शेतकऱ्यांच्या खात्यात ७,००० कोटी रुपये हस्तांतरित होणार; अहिल्यादेवी होळकर किसान कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वितरण

LIVE: आज १६.९६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ७,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे दुःखद निधन

गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूमुळे २२ मुलांचा मृत्यू; हा विषाणू किती धोकादायक आहे?

पुढील लेख
Show comments