Daily Horoscope
✕

मालवाहू जहाजाच्या धडकेने पूल नदीत कोसळला,अनेकांच्या मृत्यू

Updated: मंगळवार, 26 मार्च 2024 (14:48 IST)

मंगळवारी सकाळी पुलाचा अंशत: कोसळल्याची माहिती मिळाली. बाल्टिमोर अग्निशमन विभागानेही पूल कोसळल्याची पुष्टी केली. यानंतर मेरीलँड वाहतूक प्राधिकरणाने पुलावरील वाहतूक बंद केली आहे. 
 
तटरक्षक दल, अग्निशमन विभागासह अनेक यंत्रणांनी या दुर्घटनेत अनेकांचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पूल कोसळल्यानंतर अनेक गाड्या आणि लोक पाण्यात बुडाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच अनेक लोक बेपत्ता झाल्याची बातमी आहे. एकूणच हा अपघात मोठ्या नुकसानीकडे बोट दाखवत आहे. बाल्टिमोर अग्निशमन विभागाचे संचालक केविन कार्टराईट यांनी पुष्टी केली की अंदाजे सात लोक आणि अनेक वाहने नदीत वाहून गेली आहेत.
 
तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जहाजावर सिंगापूरचा ध्वज होता. या मालवाहू जहाजाचे नाव दाली असून ते ९४८ फूट लांब आहे. हे जहाज बाल्टिमोरहून कोलंबो, श्रीलंकेसाठी निघाले होते. यादरम्यान जहाज फ्रान्सिस स्कॉट ब्रिजला धडकले. 
हा पूल 1977 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. प्रसिद्ध अमेरिकन लेखक फ्रान्सिस स्कॉट यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. फ्रान्सिस स्कॉट ब्रिज 1.6 मैल लांब आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इराणमध्ये मोठा रस्ते अपघात: कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस उलटली, १२ जणांचा मृत्यू, १६ जण जखमी

LIVE: पुणे मॅरेथॉनमध्ये ५० लाख रुपयांच्या पेमेंटमध्ये अनियमिततेचे आरोप

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

पुढील लेख
Show comments