Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हुवाईने इराणमधील भारतीयांना कामावरून काढले

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2017 (12:53 IST)
 
हुवाई ही जगातील 500 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने तेहरानमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावरून कमी करण्याचा आदेश काढला आहे. भारत आणि चीनदरम्यान पेटलेल्या सीमावादामुळेच या कर्मचाऱ्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले, असे इंटरनॅशनल बिझिनेस टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र हुवाईने या संबंधात काहीही वक्तव्य केलेले नाही.
 
तेहरानमध्ये हुवाई कंपनीत काम करणाऱ्या रोहित नावाच्या व्यक्तीने स्वातंत्र्यदिनी या संबंधात ट्‌वीट केले आहे. त्याने पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नावे संदेश लिहिला असून त्यात या हकालपट्टीची माहिती दिली आहे. विक्रांत सिंह नावाच्या अन्य एका भारतीयानेही अशाच प्रकारे ट्‌वीट केले आहे. इराणमधील हुवाईसाठी काम करणाऱ्या सर्व भारतीयांना एक किंवा अर्ध्या दिवसांत जाण्यास तोंडी सांगितले आहे, अशी माहिती त्याने दिली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

एफडीएच्या नवीन नियमानुसार कोणत्याही भंडारा किंवा इफ्तारसाठी सात दिवसांची पूर्वपरवानगी आवश्यक

LIVE: FDA ने भंडारा, लंगर आणि इफ्तार यांसारख्या कार्यक्रमांसाठी ७ दिवस आधी परवानगी घेणे अनिवार्य केले

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची आपल्या मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या

ऑनलाइन लैंगिक शोषण म्हणजे काय? तक्रार कुठे आणि कशी करावी? युनिसेफच्या अहवालातील महत्त्वाचे खुलासे

Teachers’ Day Gift Ideas १५० ते २०० रुपयांच्या बजेटमध्ये शिक्षकांसाठी १० सर्वोत्तम भेटवस्तू पर्याय

पुढील लेख
Show comments