Marathi Biodata Maker
✕

इस्रायलचा दावा- हिजबुल्लाचा कमांडर इब्राहिम अकील ठार

Updated: शनिवार, 21 सप्टेंबर 2024 (10:31 IST)

या हल्ल्यानंतर माहिती देताना लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बेरूतच्या उपनगरी भागात इस्रायलच्या हल्ल्यात किमान आठ जण ठार तर 59 जण जखमी झाले आहेत. तर एका इस्रायली अधिकाऱ्याने सांगितले की, बेरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात वरिष्ठ हिजबुल्ला लष्करी अधिकारी इब्राहिम अकील यांना लक्ष्य करण्यात आले.

या हल्ल्यात हिजबुल्लाहचा कमांडर इब्राहिम अकीलचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे की, बेरूतवरील हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा वरिष्ठ अधिकारी इब्राहिम अकील मारला गेला आहे.

गेल्या चार दिवसांपासून इस्त्रायलकडून मोठ्या प्रमाणात नुकसान आणि हल्ले होत आहेत, याच क्रमात गेल्या मंगळवारी लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या लढवय्यांकडून संवादासाठी वापरण्यात येणारे हजारो दूरध्वनी नष्ट करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन स्फोटांमध्ये 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: मनोज जरांगे यांच्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपमुळे महायुतीत खळबळ

जिओ आयपीओने ₹7.40 लाख कोटींची विक्रमी मागणी करत बाजाराला चकित केले

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी विक्रमी ११४ पदके जिंकून चौथे स्थान पटकावले

मंत्री नितेश राणे यांनी दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीडमधील रुती तलावाला भेट दिली

कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; गिरीश महाजनांकडून राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना ध्वजारोहणाचे निमंत्रण

पुढील लेख
Show comments