रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

मक्का: घातपात घडवण्याच्या प्रयत्न उधळला

मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका दहशतवाद्याचा कट उधळून लावण्यात आला आहे. येथील निवासी इमारतीत घुसलेल्या एका आत्मघातकी हल्लेखोराला सुरक्षा रक्षकांनी घेरले. मात्र यानंतर त्यानं लगेचच स्वतःलाच स्फोटाद्वारे उडवलं. या घटनेत इमारत कोसळल्यानं पोलीस कर्मचा-यांसहीत 11 जण जखमी झाले आहेत. सोदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार,  या घटनेनंतर अन्य पाच संशयित दहशतवाद्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
रमजानच्या शेवटच्या दिवसात जगभरातील लाखो मुस्लिम मक्का येथे दाखल झाले आहेत. दरम्यान सौदी अरेबियातील अधिका-यांनी दहशतवाद्यांच्या या अयशस्वी हल्ल्याबाबत अन्य कोणताही तपशील जारी केलेला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांत सौदी अरेबियामध्ये अनेक गंभीर स्वरुपाचे हल्ले झाले आहेत.