Festival Posters

पाकिस्तानमध्ये 5 कोटी नागरिक मनोरुग्ण

नेहमीच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे तणावपूर्ण राहिले आहेत. शांतता राखण्यासाठी भारताने नेहमी प्रयत्न केले, मात्र पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देत भारतावर हल्ले करत राहिला आहे. याच पाकिस्तानसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 
भारताचा शेजारील देश पाकिस्तानची लोकसंख्या जास्त नाही, पण या लोकसंख्येपैकी एकूण 5 कोटी नागरिक हे मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले आहे.
 
याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, पाकिस्तानची एकूण लोकसंख्या जवळपास 20 कोटी आहे आणि यापैकी 5 कोटी नागरिक हे मानसिक रोगी आहेत. यामध्ये तब्बल 2 कोटी किशोरवयीन मुलांचा समावेश आहे तर दीड ते साडेतीन कोटी हे प्रौढांचा समावेश आहे.
 
एका सेमिनारमध्ये आगा खान युनिव्हर्सिटीमधील मानसोपचार विभागाच्या अध्यक्षा डॉ. आयशा मिया यांनी म्हटले की, पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्यापैकी 10 टक्के म्हणजे 20 कोटी मुलांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. 
 
10 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड मेंटल हेल्थ डे दरम्यान आयोजित मेंटल हेल्थच्या सेशनमध्ये डॉ. आयशा मिया यांनी हे वक्तव्य केले आहे. आयशा यांनी पुढे म्हटले की, मानसिक आजाराने त्रस्त असलेल्यांसंदर्भात असे म्हटले जाते की हे लोक हिंसक होतात. हे लोक इतरांपेक्षा वेगळे दिसतात आणि ते समाजासाठी काहीही करत नाहीत. 
 
परिवारातील सदस्य, मित्र आणि समाजातील नागरिकांनी अशा लोकांची मदत करायला हवी ज्यामुळे ते लवकर बरे होतील.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

विद्यापीठ विस्तार आणि आर्थिक क्षेत्रातील नवीन भरतीला मंजुरी, महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

नाशिकातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता, पोलिसांनी तपास सुरु केला

नाशिकमध्ये दारूचे पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

नाशिकमधील बस स्थानकावर एका महिला प्रवाशाचे दागिने आणि रोख रकम चोरली

सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या दोन बसची धडक, पाच जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments