गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 21 डिसेंबर 2017 (09:23 IST)

'नासा' मंगळावर दोन, तर गुरूवर एक यान पाठविणार

येत्या काही दिवसांत  अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ मंगळावर दोन, तर गुरू ग्रहावर एक यान पाठविणार आहे. या यानांच्या माध्यमातून दोन्ही ग्रहांवरील नवीन माहिती मिळेल, असे ‘नासा’चे वरिष्ठ अँटेना व मायक्रोवेव्ह शास्त्रज्ञ डॉ. नासेर चाहत यांनी सांगितले.

एमआयटी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातर्फे कोलकाता येथील चॅप्टर आॅफ आयईईई, मुंबई येथील आयईईई बॉम्बे सेक्शन आणि नागपूर येथील प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने शहरात ६व्या ‘अप्लाइड इलेक्ट्रो मॅग्नेटिक-२०१७’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.