Dharma Sangrah

भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाक इच्छूक

शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (13:11 IST)
तीन दिवसीय बोस्निया दौर्‍यावर आलेल्या नवाज शरीफ यांनी राजधानी साराजेवो येथे संसंदीय समूहाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानात सध्या कोणत्याही कुख्यात दहशतवादी संघटनेचे अस्तित्व नाही. अल-कायदा आणि तेहरिक-ए-तालिबानचा आम्ही कणखरपणे सामना केला. दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई करताना पाकिस्तानने मोठी किंमत चुकविली आहे, अशी कबूली नवाज शरीफ यांनी दिली. पाकच्या भूमितून अल-कायदाचा सफाया केल्याचे ते ठासून सांगतात. दहशतवादाच्या मुद्यावर दृढनिश्‍चयी कारवाई करण्यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. पुढे बोलतांना नवाज शरीफ म्हणतात की, भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास पाकिस्तान इच्छूक आहे. काश्मीर असो वा अन्य कोणताही मुद्दा त्यावर तोडगा काढण्यास राजी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पठाणकोट, उधमपूर आणि उरी हल्ल्यामुळे भारत-पाक यांच्यातील द्वीपक्षीय संबंधांत प्रचंड कटूता आली आहे. उभय देशांतील शांतता चर्चा पुरती ठप्प आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

मुंबईतील पाणीसाठ्यावरून आदित्य ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

LIVE: सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामतीत 'आदिशक्ती' अभियानाचा शुभारंभ

अकोल्यातील ग्रामपंचायत कार्यालयात भीषण आग, महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जळून खाक

स्नॅपड्रॅगन चिप, ग्लिफ बार आणि एआय फीचर्स सह नथिंग फोन 4b आज लॉन्च

E20, E85 आणि E100 मध्ये काय फरक आहे? वाहनासाठी कोणते सुरक्षित आहे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments