Dharma Sangrah
✕

मृत्यूचं मशीन; आत्महत्या करण्यासाठी 30 सेकंदात त्रासाशिवाय 'इच्छामृत्यू', या देशाने दिली परवानगी

Updated: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (17:14 IST)
 
आत्महत्या करण्यासाठी मशीन
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार याला स्विस सरकारकडून कायदेशीर मान्यताही मिळाली आहे आणि तुम्ही या थ्रीडी प्रीटेंड कॅप्सूलमध्ये बसून स्वत:चा जीव घेऊ शकता. विशेष म्हणजे हे तुम्ही कुठेही घेऊ शकता. ज्यांना आत्महत्या करायची आहे, त्यांना काही अटींची पूर्तता केल्यानंतर हे सारको पॉड घेऊन जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. 
 
स्थानिक वैद्यकीय पुनरावलोकन मंडळानेही या शवपेटीला कायदेशीर मान्यता दिली असून, त्याला सुसाईड पॉडही म्हटले जात आहे. स्वित्झर्लंडमध्ये 1942 पासून आत्महत्या कायदेशीर आहे आणि केवळ 2020 मध्ये 1300 हून अधिक लोकांनी इच्छामरणासाठी अशी सेवा घेतली आहे. इच्छामरणाचे वकिलही या विशिष्ट तंत्राच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत.
 
कुठेही आत्महत्या करा
एक्झिट इंटरनॅशनल या एनजीओने ही खास कॅप्सूल तयार केली असून इच्छामरणाची इच्छा असलेल्यांसाठी हे तंत्र खूप उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे पॉड बनवणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या पॉडला पाहिजे त्या ठिकाणी नेले जाऊ शकते आणि ते त्याच्या तळापासून दूर होऊ शकते. मग ते शवपेटी म्हणून वापरून, तुम्ही ते कुठेही नेऊ शकता. या अनोख्या शोधासाठी त्यांना 'डॉक्टर डेथ' हे नावही दिले जात आहे.
 
त्यांचा दावा आहे की कॅप्सूलच्या आत बसलेली व्यक्ती ऑपरेट करू शकते. मशीनबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी वापरकर्त्याला आत बसावे लागते, त्यानंतर त्याची ऑक्सिजन पातळी कमी करता येते. सध्या, इच्छामरण कॅप्सूलद्वारे दिले जाते ज्यामुळे व्यक्ती कोमात जाते.
 
आयुष्य 30 सेकंदात संपेल 
मरणासन्न व्यक्तीला या मशीनमध्ये बसून कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. आत बसल्यानंतर 30 सेकंदात कोणीही मरू शकतो. कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर पुढील वर्षापासून या विशिष्ट मशीनचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे.
 
हा पॉड बनवण्यासाठी कंपनीला खूप पैसा खर्च करावा लागला असून मरणाच्या इच्छेनुसार हे काम सोपे होईल असा त्यांचा दावा आहे. हे यंत्र म्हणजे आत्महत्येच्या घटनांना चालना देण्याचा प्रयत्न असून याद्वारे लोकांची आत्महत्या करण्याची प्रवृत्ती वाढेल, असे काही लोकांचे मत असून हे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: कार्तिक एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा केली

भारतीय संघाने नेपाळला ३०६ धावांनी पराभूत करून इतिहास रचला; लिस्ट 'A' क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय

Asia Cup Rising Stars टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर

भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शानदार शतक झळकावले! त्याचे नाव इतिहासाच्या पानांवर कोरले गेले

गिल आणि पंत डब्ल्यूटीसीमध्ये ३,००० धावांचा टप्पा गाठणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले

पुढील लेख
Show comments