रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 जून 2017 (09:52 IST)

मोदींनी दिले ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर भारत आणि चीनवर टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सेंट पीटर्सबर्ग इकोनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकीकडे गुंतवणूकदारांना आमंत्रण दिलं तर दुसरीकडे भारत पर्यावरण स्नेही असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, भारत देश प्राचीन काळापासूनच याची जबाबदारी पार पाडत आला आहे. यासंदर्भातील त्यांनी दोन उदाहरणं दिली.  
 
मोदी यांनी सांगितले की, भारताला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे.  5 हजार वर्ष जुनी शास्त्रं आमच्याकडे उपलब्ध आहेत, जे वेद या नावानं ओळखले जातात. यातील एक वेद म्हणजे अथर्ववेद जे पूर्णतः निसर्गाला समर्पित आहे. आम्ही त्या आदर्शांना पुढे घेऊन जात आहोत. निसर्गाचं शोषण करणं आम्ही गुन्हा मानतो. आम्ही निसर्गाचं शोषण स्वीकारत नाही.  यासाठी आम्ही आमच्या ''उत्पादन क्षेत्रात शून्य दोष, शून्य परिणाम'' या तत्त्वावर चालतो.