Dharma Sangrah
✕

मधमाशांसाठीच्या जगातील पहिल्या लशीला अमेरिकेची मान्यता

Updated: सोमवार, 9 जानेवारी 2023 (22:04 IST)
 
अमेरिकेच्या कृषी विभागानुसार, 2006 पासून मधमाशांच्या वसाहतींमध्ये घट झाली आहे. त्यांच्यानुसार, किटक, रोग अशा अनेक कारणांमुळे मधमाशांना धोका निर्माण होतो. तसंच ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ या प्रकारात कामकरी मधमाश्या पोळे सोडत राणीला मागे सोडतात.
 
मधमाश्या, पक्षी आणि वटवाघूळ जगाच्या सुमारे एक तृतीयांश पीक उत्पादनासाठी जबाबदार आहेत असं संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने म्हटलं आहे.
 
परंतु ‘अमेरिकन फाऊलब्रूड’ हा आजार मधमाशा पाळणाऱ्यांसाठी मोठं आव्हान आहे कारण हा आजार अत्यंत संसर्गजन्य असून त्यावर कोणताही इलाज नाही.
 
संक्रमित मधमाशांच्या वसाहतींना उपकरणांसह जाळणं आणि आसपासच्या वसाहतींचा उपचार अँटीबॉडीजने करणं ही एकच उपचार पद्धती आहे.
 
‘दालान अनीमल हेल्थ’नुसार, नवीन लशीमध्ये बॅक्टेरियाची निष्क्रिय आवृत्ती आहे, ज्यामुळे अमेरिकन फाऊलब्रूड आणि पेनिबॅसिलस लार्व्हा होतो.
 
कामकरी माशांनी राणी मधमाशीला दिलेल्या रॉयल जेलीमध्ये हा बॅक्टेरिया समाविष्ट केला जातो. काही लस मधमाशीच्या अंडाशयात ठेवतात.
 
किटकांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक्षमता या विषयात तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बायोटेक कंपनीनुसार, या लशीमुळे मधमाश्यांना रोगप्रतिकारशक्ती मिळते. यामुळे आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी होतं.
 
कॅलिफोर्नियातील बीकीपर संघटनेचे सदस्य ट्रेव्हर टॉझर यांनी म्हटलंय की, नवीन लस ‘मधमाशा पाळणाऱ्यांसाठी रोमांचक पाऊल’ आहे.
 
ते म्हणाले, “मधमाश्यांच्या पोळ्यांमध्ये होणारा संसर्ग आपण रोखला तर आपण महाग उपचार टाळू शकतो आणि मधमाश्यांना निरोगी ठेवण्याच्या इतर पद्धतींकडे अधिक लक्ष देऊ शकतो.”
 
ही लस सध्या व्यावसायिक मधमाश्या पाळणाऱ्यांना वितरित करण्याची योजना आहे. तसंच यावर्षीपासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल, असंही दालान म्हणाले.  
 
Published By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदीसाठी

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; पदोन्नतीसाठी असलेली ५० वर्षांची वयोमर्यादा रद्द

नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदी

हुथी बंडखोरांचा सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर मोठा हल्ला, १२ ठार ३०० हुन अधिक जखमी

मी माझ्या गावी जात आहे, सुटकेनंतर अभिजीत दीपकेची पोस्ट, सीजेपी मागे हटणार नाही

पुढील लेख