शनिवार, 26 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified मंगळवार, 28 जुलै 2015 (13:48 IST)

VIDEO: एस्केलेटरमध्ये अडकून आईचा मृत्यू, पण मुलाला वाचवण्यात आले

चीनच्या हुबेई प्रांतात जियांगशूमधील शॉपिंग सेंटरमध्ये दोन वर्षाचा मुलगा एस्कलेटरमध्ये अडकला. त्याच्या आईने उडी मारून मुलाला वाचवले पण स्वत:चा बचाव करू शकली नाही. किमान चार तासाच्या मशक्कत नंतर तिचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.  

ही घटना रविवार 26 जुलैची आहे. प्रत्यक्षदर्शियांनुसार, एस्कलेटरची मरम्मत झाली होती. काम करणार्‍यांनी त्याचा मैटल पैनल लावला होता पण त्याचे पेंच कसायचे विसरले होते. या पॅनलवर जेव्हा मुलगा पोहोचला तर तो थोडा सरकला. मुलगा मशीनमध्ये अडकत आहे हे बघून त्याच्या आईने त्याला पकडले आणि वर फेकले. तेथे उभे असणार्‍या लोकांना त्याला पकडून घेतले. या दरम्यान, पॅनलला आईने पकडले आणि त्यात ती अडकली. आईचे नाव होते शियांग लियूजुआन. ती 30 वर्षाची होती.