Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंटरव्हयू देण्यापूर्वी काळजी करत आहात,अशा प्रकारे तयारी करा

Updated: शुक्रवार, 18 जून 2021 (20:20 IST)
 
1 केवळ पदासाठी पात्र असल्यामुळे आपली निवड होईल असं नाही.या साठी आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रभावी असले पाहिजे.या साठी आपल्याला आपल्या लूक कडे देखील लक्ष दिले पाहिजे.
 
2 आपण स्वतःला आणि आपल्या गोष्टींची मांडणी इंटरव्यू मध्ये कशी करता, हे मुलाखतीत आपल्या यशासाठी खूप महत्त्वाचे आहे.
 
3 बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला जातो की येत्या 5 वर्षात आपण स्वतःला कुठे बघता? हे प्रश्न आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी विचारले जातात.म्हणून आपली उत्तरे आत्मविश्वासाने भरलेली आणि तार्किक असावी.
 
4 इंटरव्ह्यू ला जाताना हे लक्षात ठेवा की ''फर्स्ट इम्प्रेशन इज दि लास्ट इम्प्रेशन''बऱ्याच वेळा आपले परिधान देखील आपले काम खराब करतात.म्हणून मुलाखतीला जाताना कपडे नेहमी इस्त्री केलेले आणि  नेहमी फॉर्मल कपडे घाला.
 
5 कॅज्युअल आणि फंकी कपडे घालून मुलाखतीला जाणे मूर्खपणा आहे. कारण आपण जे परिधान करता त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.म्हणून नेहमी कपड्यांची निवड जाणीवपूर्वक करावी आणि आपण सभ्य दिसाल असे कपडे निवडावे.
 
6 चिंता करणे काही वाईट नाही परंतु या मुळे खाणंपिणं सोडून मुलाखतीस जाणं चांगले नाही.असं केल्याने तब्बेत खराब होण्याची शक्यता असते.म्हणून नेहमी हलकं अन्न खाऊनच मुलाखतीला जावे.
 
7 हॉलच्या आत जाण्यापूर्वी दीर्घ श्वास घेऊन आरामात जावे.मुलाखतीस जाण्यापूर्वी आपली सखोल योजना आखावी,जाण्यापूर्वी सर्व महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक घ्या. हॉल मध्ये जाताना तोंडात च्युईंगम किंवा इतर काही ठेवू नका.
 
8 आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींची नेहमी काळजी घ्या.नेहमी मुलाखतीत आपला कमकुवतपणा लपवू नका. हे अवश्य सांगा की आपण आपल्या नकारात्मक बिंदूंना ओळखता आणि ते नकारात्मक बिंदू आपल्याला आपल्यातून बाहेर काढायचे आहे. 
 
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

लघु कथा : आणखी एक शेवटचा प्रयत्न! गोष्ट मूर्तिकाराची

रेस्टॉरंटसारखा तंदूरी गोबी टिक्का बनवा घरीच; लिहून घ्या रेसिपी

World Mosquito Day 2026 : जागतिक डास दिन; डासांपासून बचावाचे सोपे उपाय

कोणत्याही उपवासाला चालणारी, पौष्टिक अशा तीन खास टिक्की रेसिपीज

या ५ प्रकारच्या लोकांनी डाळिंब खाण्यापूर्वी सावधगिरी बाळगा

पुढील लेख
Show comments