गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By

आयपीएलमधील पाच विस्फोटक फलंदाज

येणार्‍या 5 तारखेपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये जगभरातील क्रिकेटर खेळतात. 
आयपीएलमधील टॉप-5 विस्फोटक फलंदाज
विराट कोहली : आरसीबीचा कर्णधार विदार कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाजांच्या यादीत विराट सध्या नंबर एकवर आहे. त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 शतके आरि 26 अर्धशतके झळकावली आहेत. 

ख्रिस गेल : विस्फोटक फलंदाज नाव घेतल्यास पहिलं नाव ख्रिस गेलचे आहे. गेलने आयपीएलमध्ये 20 अर्धशतकं आणि 5 शतकांसह 3426 धावा केल्या आहेत. 
गौतम गंभीर : गौतम गंभीरची देखील आयपीएलमधील स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. गंभीरनं आयपीएलमध्ये 31 अर्धशतकं झळकावली असून त्याच्या नावावर 3634 धावा जमा आहेत. 
रोहित शर्मा : मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि स्फोटक फलंदाज रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्यानं 1 शतक आणि 29 अर्धशतकं झळकावली आहेत. तर 3874 धावा त्याच्या नावावर जमा आहेत. 
सुरेश रैना : गुजरात लायन्स संघाचा कर्णधार सुरेश रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यानं आयपीएलमध्ये 1 शतक आणि 28 अर्धशकांसह 4018 धावा केल्या आहेत.