suvichar
✕

RCB vs MI Playing 11: बंगळुरूचा संघ मुंबईविरुद्ध जिंकण्याचा प्रयत्न करेल,प्लेइंग 11 जाणून घ्या

Updated: रविवार, 2 एप्रिल 2023 (16:59 IST)
 
मुंबईचा संघ बेंगळुरूविरुद्धच्या मागील तीन सामन्यात पराभूत झाला आहे. आयपीएल 2021 मध्ये, बंगळुरूने दोन्ही सामने जिंकले. 2022 मध्ये दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले असून, बंगळुरूने सात गडी राखून विजय मिळवला आहे. आता फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा संघ मुंबईविरुद्ध विजय मिळवण्याकडे लक्ष देईल. मात्र, एकूण रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. 
 
मुंबई आणि बंगळुरू यांच्यात आयपीएलमध्ये 30 सामने झाले आहेत. यामध्ये एमआयने 17 सामने जिंकले आहेत, तर बंगळुरूने 13 सामने जिंकले आहेत. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघांच्या विक्रमाबद्दल बोलायचे तर, दोघांमध्ये 10 सामने झाले आहेत. या स्टेडियमवर मुंबईचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे आणि चिन्नास्वामी येथे बेंगळुरूविरुद्ध आठ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर बंगळुरूने आपल्या घरच्या मैदानावर मुंबईविरुद्ध केवळ दोनच सामने जिंकले आहेत. 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, तर काही खेळाडू अद्याप संघात सहभागी झालेले नाहीत. जोश हेझलवूड, रजत पाटीदार हे दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांतून बाहेर पडले आहेत. तो संघात जाणार की नाही हे अद्यापही ठरलेले नाही. त्याचवेळी वानिंदू हसरंगा न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यात व्यस्त आहे. काही सामन्यांनंतर तो आरसीबी संघात सामील होईल. त्याचवेळी मुंबई इंडियन्ससाठी बुमराहशिवाय जे रिचर्डसनही दुखापतग्रस्त आहे. बुमराहच्या जागी मुंबईने संदीप वारियरला संघात सामील केले आहे.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
बेंगळुरूचे प्लेइंग-11
संभाव्य 11 (RCB) काय असू शकते: फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टोपले मोहम्मद सिराज .
 
 
मुंबईने चे प्लेइंग 11
 (MI): रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, रमणदीप सिंग, जोफ्रा आर्चर, हृतिक शोकीन, संदीप वॉरियर, जेसन बेहरेनडॉर्फ.
 
Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments