suvichar
✕

राजस्थानचा सहा गडी राखून विजय

कोलकाता उपांत्य पूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर

Written By भाषा
Updated: बुधवार, 21 मे 2008 (00:47 IST)
' मॅन ऑफ द मॅच' युसूफ पठाणने आज आक्रमक फलंदाजी करताना नाबाद 48 धावा (18 चेंडूत, 5 चौकार, 3 षटकार) आणि मोहम्मद कैफच्या नाबाद 34 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या कोलकाता नाइट रायडर्सचा सहा गडी राखून पराभव केला.

युसुफ पठाण आणि कैफने पाचव्या विकेटसाठी केलेल्या विजयी 81 धावांच्या भागिदारी केवळ 40 चेंडूत पूर्ण केली आण‍ि संघाला 21 चेंडू शेष ठेवून विजय मिळवून दिला.

राजस्थानचा संघ अगोदरच उपांत्य पूर्व फेरीत पोहचला होता. परंतु, कोलकाता नाईट रायडर्सला आजचा सामना 'जिंका किंवा मरा' अशा स्वरूपाचा होता. मात्र, संघाचा पराभव झाल्यामुळे उपांत्य पूर्व फेरीच्या शर्यतीतून कोलकाता बाद झाला आहे.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने राजस्थानपुढे विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्यांनी 16.3 षटकात चार गडी गमावून 150 धावा केल्या. स्कोर बोर्डवर धावसंख्या कमी असल्यामुळ पराभव झाला असल्याचे कोलकात्याचा कर्णधार सौरव गांगुली याने सांगितले.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

सिबिल स्कोर न तपासता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या; कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यासही बंदी

LIVE: १४ महिलांची फसवणूक करणारा आरोपी मोहम्मद माजिन यूएईतून अटक

१४ तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून गंडा घालणारा मोहम्मद माजिन यूएईतून जेरबंद; महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई

राजस्थान पंचायत निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव; काँग्रेसने ३१ पैकी २१ जागा जिंकल्या

हनीमूनदरम्यान बार्बेक्यूच्या आगीत होरपळलेली नवविवाहित महिला, दोन महिन्यांनंतर मरण पावली

Show comments