1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2024
Written By
Last Modified: बुधवार, 3 एप्रिल 2024 (09:54 IST)

आयपीएलच्या "या" दोन सामन्यांच्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल

ipl2024
आयपीएलच्या १७व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातील सर्व सामने रोमांचक होत आहेत. पण सामन्यासंदर्भात आयपीएलकडून आता मोठी अपडेट देण्यात आली आहे.
 
दोन सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आली आहे. राजस्थान विरुद्ध  कोलकाता, गुजरात विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. आयपीएलने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
 
सुरक्षेच्या कारणास्तव कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना 16 एप्रिल रोजी कोलकाता येथे ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. याआधी हा सामना 17 एप्रिल रोजी होणार होता. तर 16 एप्रिल रोजी होणारा गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना 17 एप्रिल रोजी होणार आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor