Festival Posters
✕

DC vs RR :दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला

Updated: मंगळवार, 7 मे 2024 (23:53 IST)
 
राजस्थान संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्यांचा एका धावेने पराभव केला होता. त्याचबरोबर दिल्लीचा 12 सामन्यांमधला हा सहावा विजय ठरला. त्याचे 12 गुण आहेत. संघ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. 

राजस्थान संघाला प्लेऑफसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचे 16 गुण आहेत. दिल्लीचा पुढील सामना 12 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध चिन्नास्वामी येथे होणार आहे.तर राजस्थान रॉयलचा संघ 12 मे रोजी चेपॉक मध्ये चैन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. 

या सामन्यात सॅमसनचा पंचांशी वाद झाला. शाई होपने त्याचा झेल घेतला. तिसऱ्या पंचाने तपासून सॅमसनला झेलबाद घोषित केले. मात्र, व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर चेंडू सीमा दोरीला स्पर्श करत असल्याचे दिसून आले. सॅमसनचाही यावर विश्वास बसला नाही आणि त्याने पंचाशी वाद घातला.
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

IND vs NZ 4th ODI: टीम इंडियाचा २४४ धावांनी दारुण पराभव, न्यूझीलंडचे पुनरागमन

कुसल मेंडिसने शतक झळकावून इतिहास रचला, पहिल्या कसोटीत शतक झळकावले

Cricket matches १३ नोव्हेंबर या एकाच दिवशी चार मोठे सामने खेळले जातील, वेळापत्रक पहा

भारताने १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

पुढील लेख
Show comments