deepawali
✕

मुंबई इंडियन्सचा पहिला विजय

Updated: सोमवार, 8 एप्रिल 2024 (09:37 IST)
 
शेफर्डने त्याच्या पहिल्याच षटकात दिल्लीला धक्का देताना डेव्हिड वॉर्नरला(१०) चतुराईने माघारी पाठवले. पृथ्वी शॉ आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी ४९ चेंडूंत ८८ धावा जोडल्या. जसप्रीत बुमराहने भन्नाट यॉर्करवर पृथ्वीचा (६६) त्रिफळा उडवून सामना फिरवला. बुमराहने त्याच्या पुढच्या षटकात आणखी एक सेट फलंदाज पोरेल ( ४१) याला बाद करून दिल्लीला मोठा धक्का दिला. चेंडू व धावा यांतील अंतर प्रचंड वाढले होते आणि त्या दडपणार रिषभ पंत (१) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
 
फलंदाजीत बढती मिळालेला त्रिस्तान स्तब्सने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पण, १२ चेंडूंत ५५ धावा डीसीला विजयासाठी हव्या होत्या. स्तब्सने १९ व्या षटकात शेफर्डच्या पहिल्या दोन चेंडूंवर षटकार खेचले. १८.२ षटकांत मुंबईच्या ५ बाद १८९ धावा होत्या आणि दिल्लीच्या ४ बाद १९२ झाल्या. पण, चौथ्या चेंडूवर इशान किशनने चतुराईने अक्षर पटेलला (८) रन आऊट करून सामन्यात रंगत आणली. ७ चेंडूंत ४० धावा हव्या असताना स्तब्सने षटकार खेचला, परंतु अखेरच्या षटकात स्ट्राईक ललित यादवकडे गेली. ललितने पहिल्या चेंडूवर २ धावा घेतल्या आणि अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ५ चेंडूंत ३२ धावा दिल्लीच्या करायच्या होत्या. तिस-या चेंडूवर स्तब्स बाद झाला. तो २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला. गेराल्ड कोएत्झीने सलग दोन चेंडूवर दोन धक्के दिले आणि शेवटच्या षटकात ३ विकेट घेतल्या. दिल्लीला ८ बाद २०५ धावा करता आल्या आणि २९ धावांनी सामना जिंकला.
 
तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ४९) व इशान किशन ( ४२) यांना बाद करून अक्षर पटलेने मुंबईला मोठे धक्के दिले. सूर्यकुमार यादव ( ०) व तिलक वर्मा ( ६) हे अपयशी ठरले. कर्णधार हार्दिक ( ३९) व टीम डेव्हिड यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. रोमारियो शेफर्डने शेवटच्या षटकात ४,६,६,६,४,६ अशा ३२ धावा कुटल्या आणि संघाला ५ बाद २३४ धावांपर्यंत पोहोचवले. डेव्हिडने २१ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या, तर शेफर्टने १० चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी केली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

IND vs NZ T20I मालिकेदरम्यान स्टार वेगवान गोलंदाज पुढील ३ सामन्यांमधून बाहेर पडला

रायझिंग एशिया कप २०२६ चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या दिवशी होणार

IND v NZ 2nd T20 : दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत केले

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली

भारतीय संघाने महिला चॅम्पियनशिप २०२५-२९ मध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला ९ गडी राखून पराभूत केले

पुढील लेख
Show comments