Biodata Maker marathi
✕

IPL 2024: हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविचचे नाते संपुष्टात आले

Updated: शुक्रवार, 24 मे 2024 (17:38 IST)
 
याशिवाय मॉडेलने हार्दिकसोबतचे तिचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत. दोघांनी 2020 मध्ये लग्न केले. त्याच वर्षी नताशाने अगस्त्य पांड्या नावाच्या मुलाला जन्म दिला.  4 मार्चला नताशाचा वाढदिवस असल्याने या काळात हार्दिकच्या बाजूने कोणतीही पोस्ट करण्यात आली नाही. या कारणास्तव त्यांच्या विभक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
चित्रपट अभिनेत्रीने हार्दिकसोबतचे तिचे अलीकडील सर्व फोटो सोशल मीडियावरून हटवले, ज्यात अगस्त्य तिच्यासोबत आहे.नताशापूर्वी हार्दिकचे नाव अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. मात्र, हार्दिकने या सर्व गोष्टींचा इन्कार केला होता. यानंतर हार्दिकने नताशा स्टॅनकोविचशी नाईट क्लबमध्ये भेट घेतली. हार्दिक क्रिकेटर आहे हे तेव्हा नताशाला माहीत नव्हते. खुद्द हार्दिकने ही गोष्ट सांगितली होती. तो म्हणाला होता- नताशाला मी कोण आहे याची कल्पना नव्हती. आम्ही एकमेकांशी बोललो आणि हळूहळू जवळ आलो. आम्ही भेटलो.
 
हार्दिक म्हणाला- मी रात्री एक वाजता टोपी, गळ्यात चेन आणि हातात घड्याळ घालून बसलो होतो.आमचा संवाद सुरू झाला. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. हार्दिक आणि स्टॅनकोविच अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले. मात्र, 2020 पूर्वी या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही.

हार्दिकला वाटले की नताशा ही योग्य व्यक्ती आहे जिच्यासोबत तो आपले संपूर्ण आयुष्य घालवू शकतो. त्यानंतर हार्दिकने नताशाची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. वर्षभरातच हार्दिकने या नात्यावर शिक्कामोर्तब केले.त्यांचा साखरपुडा होणार हे हार्दिकच्या आई वडिलांना माहित नव्हते. हार्दिकने एका खासगी समारंभात नताशासोबत लग्नगाठ बांधली . जुलै मध्ये त्यांनी त्यांच्या कडे अपत्य येणार अशी बातमी दिली. आता त्यांचे नाते संपुष्टात आल्याची चर्चा सुरु आहे. 

Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एक सामना होणार! सामना किती वाजता सुरू होईल?

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

IND vs NZ बुमराहच्या गोलंदाजीने उडवली खळबळ! ७० धावांत ५ बळी

एशिया कप रायझिंग स्टार्स आजपासून सुरू; भारताचा 'अ' संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल

युझवेंद्र चहलने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला, ४०० बळी घेणारा पहिला भारतीय ठरला

पुढील लेख
Show comments