Marathi Biodata Maker
✕

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

Updated: बुधवार, 24 एप्रिल 2024 (18:25 IST)
 
 मार्कस स्टॉइनिसने CSK विरुद्ध 124 धावांची नाबाद खेळी खेळली. पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला असताना तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. स्टॉइनिसने 63 चेंडूत एवढी मोठी खेळी खेळली. याआधी आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना एवढी मोठी खेळी कधीच खेळली गेली नव्हती. 2011 च्या आयपीएलमध्ये पंजाबचा फलंदाज पॉल वाल्थाटीने मोहालीत सीएसकेविरुद्ध नाबाद 120 धावांची खेळी केली होती. तेव्हापासून आजपर्यंत हा विक्रम अतूट होता, मात्र आता तो मोडीत काढण्याचे काम मार्कसने केले आहे. मात्र, भारतीय फलंदाजाबद्दल बोलायचे झाले तर पॉल वॅल्थाटी पहिल्या क्रमांकावर आहे. 

मार्कस स्टॉइनिसला प्रथम फलंदाजीत काही काळ कर्णधार केएल राहुलची साथ मिळाली आणि त्यानंतर देवदत्त पडिक्कलसोबतही त्याने भागीदारी केली. मात्र 88 धावांवर एलएसजीने 3 महत्त्वाचे विकेट गमावल्यानंतर हे लक्ष्य अवघड वाटू लागले. पण निकोलस पुरण ने त्याला काही काळ साथ दिली. पुरणने 15 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी केली. शेवटी, दीपक हुडाने 6 चेंडूत 17 धावा केल्या आणि मार्कस स्टॉइनिसच्या साथीने आपल्या संघाला विजयाच्या दारात नेले.
 
Edited By- Priya Dixit  
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

ग्लेन फिलिप्सच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सलग दुसरा टी२० सामना जिंकला

कागिसो रबाडा सर्वात जलद ३५० कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला

भारत विरुद्ध न्यूझीलंड:पाचव्या टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि कुलदीप यादव यांना संधी मिळणार का? संभाव्य प्लेइंग ११

१९ वर्षांखालील आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर, ज्युनियर सेहवाग आणि ज्युनियर द्रविड यांना संधी

IND vs NZ : न्यूझीलंडने भारताला ८७ धावांनी हरवले, भारतीय संघ मालिकेत आघाडीवर

पुढील लेख
Show comments