Daily Horoscope

राजस्थानने क्वालिफायर 2 मध्ये बंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला

Updated: गुरूवार, 23 मे 2024 (09:30 IST)
 
173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सहाव्या षटकात लॉकी फर्ग्युसनने टॉम कोहलर कॅडमोरला (20) बॉलिंग करून बंगळुरूला पहिले यश मिळवून दिले. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसनने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.
 
10व्या षटकात 30 चेंडूत 45 धावा करून यशस्वीही पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसरी विकेट म्हणून करण शर्माने संजूला (17) धावांवर यष्टिचित केले. ध्रुव जुरेलवर (8) धावबाद झाला. रियान पराग 26 चेंडूत 36 धावा करून बाद झाला तर शिमरॉन हेटमायर 14 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. रोव्हमन पॉवेलने आठ चेंडूंत 16 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. राजस्थान रॉयल्सने 19 षटकांत सहा गडी गमावत 174 धावा केल्या आणि सामना चार विकेटने जिंकला.
 
बेंगळुरूकडून मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, रजत पाटीदार (34) आणि विराट कोहली (33 ) यांच्या खेळीच्या जोरावर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य दिले होते.
 
आज येथे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेंगळुरूने चांगली फलंदाजी केली नाही आणि पाचव्या षटकात कर्णधार फाफ डू प्लेसिसची (17) विकेट गमावली. तो पॉवेलच्या हातून ट्रेंट बोल्टकडे झेलबाद झाला. यानंतर आठव्या षटकात विराट कोहली युझवेंद्र चहलकरवी डी फरेराकडे झेलबाद झाला. कोहलीने 24 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार लगावत 33 धावा केल्या.
 
कॅमेरून ग्रीन 21 चेंडूत (27), ग्लेन मॅक्सवेल (0) बाद झाले. दोन्ही फलंदाज आर अश्विनने बाद केले. रजत पाटीदारने 22 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह (34) धावा केल्या. त्याला आवेश खानने बाद केले. दिनेश कार्तिकला (11) आवेश खानने बाद केले. महिपाल लोमररने 17 चेंडूत (32) धावा केल्या. आठव्या विकेटच्या रूपात कर्ण शर्मा (5) चेंडूवर 5 धावा करून अखेर बाद झाला. 9 धावा केल्यानंतर स्वप्नील सिंग (9) नाबाद राहिला. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 172 धावा केल्या.
 
राजस्थान रॉयल्सकडून आवेश खानने तीन बळी घेतले. रवी अश्विनला दोन बळी मिळाले. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Asian Games भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिला सामना जपानविरुद्ध खेळेल

डेव्हिस कपच्या दुसऱ्या फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना होणार! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा?

भारतीय आणि अफगाण संघ आज तिसऱ्या आणि अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, गायकवाडची वापसी; नमन धीर आणि आकिब नबीला वनडेमध्ये पहिली संधी

क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी खासदार प्रिया सरोज यांचा विवाह या दिवशी होणार

पुढील लेख
Show comments