suvichar
✕

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Updated: सोमवार, 13 मे 2024 (00:00 IST)

आयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. आरसीबीचा हा सलग पाचवा विजय ठरला. हा संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. 13 सामन्यांत सहा विजय आणि सात पराभवांसह त्यांचे 12 गुण आहेत. दिल्लीवरील विजयासह संघ पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. बेंगळुरूला शेवटचा सामना 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध चिन्नास्वामी येथे खेळायचा आहे. या सामन्यावर दोन्ही संघांचे भवितव्य अवलंबून असेल. चेन्नई जिंकल्यास आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
 
बेंगळुरू-दिल्ली आणि लखनौ या तिघांचेही 12-12 गुण आहेत. लखनौने आतापर्यंत केवळ 11 सामने खेळले. कोलकाता संघ आधीच 18 गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्याचवेळी राजस्थान 12 सामन्यांत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईचे 13 सामन्यांनंतर 14 गुण आहेत, तर सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकात 9 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. रजत पाटीदारने 32 चेंडूत 52 तर विल जॅकने 29 चेंडूत 41 धावा केल्या. विराट कोहलीने 27 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 19.1 षटकांत 140 धावांवर गारद झाला.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

भारतीय संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करून २३ वर्षांचा जागतिक विक्रम मोडत इतिहास रचला

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

शुभमन गिलला ICC कडून मोठा धक्का: चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी नाही

एशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत तीन संघ पोहोचले, चौथा संघ आज निश्चित होणार

माझ्या मौनाला कमजोरी समजू नये...क्रिकेटपटू पृथ्वी शॉने युवराज सिंगच्या वडिलांना कायदेशीर कारवाईची धमकी दिली

पुढील लेख
Show comments