suvichar
✕

Google Maps चे हे 5 शानदार फीचर्स, माहित नसतील तर जाणून घ्या

Updated: शनिवार, 11 मे 2024 (17:05 IST)
 
1. ऑफलाइन मॅप
मॅप वापरत असताना कधी इंटरनेट नसल्यास किंवा नेटवर्क उपलब्ध नसल्याची परिस्थिती उद्भवते. अशात मॅप कसे वापरावे अशा प्रश्न असेल तर या ॲपमध्ये तुम्हाला ऑफलाइन मॅपची सुविधाही मिळते. या फीचरमुळे तुम्ही इंटरनेटशिवाय मॅप वापरू शकाल. यासाठी तुम्ही जिथे जात आहात त्या ठिकाणाचा मॅप अगोदर डाउनलोड करावा लागेल. यासाठी तुम्हाला ऑफलाइन मॅप पाहिजे असलेले ठिकाण शोधावे लागेल. वरच्या उजव्या कॉर्नरवर असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करुन तुम्हाला ऑफलाइन मॅप डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. जर तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी जात असाल जिथे नेटवर्कचा इशू असेल तर हे वैशिष्ट्य तिथे खूप उपयुक्त ठरू शकते.
 
2. सेव्ह पार्किंग फीचर
जर आपल्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आपले वाहन शोधण्यात समस्या येत असेल तर गूगल मॅप्सचा हा फीचर आपल्यासाठी फायद्याचा ठरेल. गूगल मॅप्सचा सेव्ह पार्किंग फीचर आपले काम सोपे करेल. आपली गाडी पार्क केल्यानंतर गूगल मोप्स अॅप उघडायचे आहे आणि आपली लोकेशन दाखवत असलेल्या ब्लू डॉट ला टच करायचे आहे. याने आपल्या सेव्ह पार्किंग ऑप्शन दिसेल. एंड्रॉयड फोन असल्यास लोकेशनसह फोटो आणि नोट्स देखील जोडता येऊ शकतात. या व्यतिरिक्त गाडीची लोकेशन आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सामील एखाद्या व्यक्तीला शेअर देखील करु शकतात. जर कुठे गाडी सोडायची असेल तर हे फीचर ख़प कामास येते.
 
3. स्टिकी नोट
गूगल मॅप्समध्ये लेबल जोडण्याचे वैशिष्ट्य देखील गोष्टी खूप सोपे करते. हे तुमच्या आवडत्या ठिकाणी एक स्टिकी नोट जोडण्यासारखे आहे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी असाल जे तुम्हाला खूप आवडत असेल तर हे फीचर तुम्हाला ते ठिकाण तुम्हाला हवं तसं दाखवेल. यासाठी तुम्हाला ॲपवर एक स्थान निवडावे लागेल आणि त्याच्या नावावर टॅप करावे लागेल, जे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती उघड करेल. यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कॉर्नरला असलेल्या डॉट्सवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला एड ​​लेबलचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या ठिकाणाचे नाव देऊ शकता. आता तुम्ही जेव्हा जेव्हा गुगल मॅप उघडता तेव्हा तुम्हाला ते ठिकाण लगेच ओळखता येईल. यामुळे तुमच्या आवडत्या ठिकाणांचा मागोवा घेणे खूप सोपे होते.
 
4. मल्टीपल लोकेशंस
आपल्या एकापेक्षा अधिक ठिकाणी जायचे असल्यास काळजी करण्याची गरज नाही. आपल्या या समस्येचे निराकरण गुगल मॅपवरही उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मार्गातील लोकेशन्स पिन देखील करू शकता. यानंतर मॅप तुम्हाला तोच मार्ग दाखवेल जो त्या पिन लोकेशनमधून जाईल. यासाठी फायनल लोकेशन टाकल्यानंतर ॲड स्टॉपचा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी थांबायचे आहे ते स्थान टाकावे लागेल. यानंतर मॅप आपोआप तुम्हाला मार्ग सांगेल जो मध्यभागी न थांबता अंतिम गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी सर्वोत्तम मार्ग असेल.
 
5. रियल टाइम लोकेशन शेयरिंग
जर तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना फोन न करता तुम्ही कुठे आहात हे सांगायचे असेल किंवा तुम्हाला कोणालातरी भेटायचे असेल आणि त्यांना ते सापडत नसेल तर अशा परिस्थितीत हे फीचर खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही तुमच्या संपर्क यादीतील कोणाशीही तुमचे रिअल-टाइम स्थान शेअर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करावे लागेल. यानंतर लोकेशन शेअरिंग पर्याय निवडा आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला तुमचे लोकेशन शेअर करायचे आहे ती निवडा. तुमचे स्थान कोणाशी तरी किती काळ शेअर करायचे हे तुम्ही ठरवू शकता. तुम्ही त्याचा कालावधी 15 मिनिटांपासून 24 तासांपर्यंत निवडू शकता. कालावधी संपल्यानंतर स्थान शेअरिंग आपोआप थांबते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वापरावर बंदी

ठाण्यातील ४५ हजार भाविकांसाठी मोठी खुशखबर; आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

पुढील लेख
Show comments