ganesh chaturthi
✕

व्हॉट्सअ‍ॅपवर या 5 चुका करू नका,या मुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात

Updated: रविवार, 4 एप्रिल 2021 (15:32 IST)
 
1  या फोन नंबरपासून मुक्त व्हा-
मेसेज पाठवण्यासाठी आपण बर्‍याच वेळा नंबर सेव्ह करतो. उदाहरणार्थ- आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला बर्‍याच वेळा कामानिमित्त फोन लावतो नंतर तो नंबर  एकदा काम पूर्ण झाल्यावर  हटविणे विसरतो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आपले व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाईल ते स्टेटसपर्यंत पाहू शकते. यामुळे अज्ञात व्यक्तीकडे वैयक्तिक माहिती पुरविली जाते. अशा परिस्थितीत आपली कॉन्टॅक्ट यादी वेळोवेळी साफ करत रहा. 
 
2 टू-स्टेप व्हेरिफिकेशन' सक्रिय करा -
हे व्हॉट्सअ‍ॅप चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. टू स्टेप व्हेरिफिकेशन साठी द्वारे 6-अंकी पिन सेट करावा लागेल. कोणत्याही नवीन डिव्हाइसमध्ये, या पिनसाठी आपल्या नंबरसह व्हॉट्सअ‍ॅपवर लॉग इन करताना आवश्यक असेल.  सायबर फसवणूकीच्या या युगात व्हॉट्सअ‍ॅपचे  टू स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय केले जाणे आवश्यक आहे
 
3 असे मेसेज कधीही करू नका- 
व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्याकडे बर्‍याच प्रकारचे मेसेजेस येत असतात. कोणतीही माहिती किंवा बातमी अग्रेषित करण्यापूर्वी, ते बनावट बातमी नसल्याचे सुनिश्चित करा. याव्यतिरिक्त, अनेक बनावट लिंक देखील पाठवले जातात. त्यांना पुढे पाठवू नका. कोणत्याही धर्म किंवा  समुदायाशी निगडित संदेश पाठवू नका. या मुळे आपल्याला अटक देखील होऊ शकते.  
 
4 ऑटो-बॅकअप बंद करा- 
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ऑटो-बॅकअपचे एक वैशिष्ट्य प्रदान केले गेले आहे, जे आपल्या संदेशाचा बॅकअप Google ड्राइव्ह किंवा आयक्लॉडवर ठेवते. तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे येथे संदेश पोहोचल्यानंतर जर कोणी आपले Google किंवा apple अकाउंट हॅक केल्यावर आपले चॅट वाचू शकतो. म्हणून चॅट एक्स्पोर्ट करून सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवा. 
 
5 कधीही अश्लील व्हिडिओ पाठवू नका- 
व्हॉट्सअ‍ॅप वर अश्लील सामग्री सामायिक केल्याने आपण अडचणीत येऊ शकता. कोणी जर आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकऊंटची रिपोर्ट केल्यावर आपले अकाउंट बॅन केले जाऊ शकते. आणि ती व्यक्ती पोलिसात तक्रार करू शकते. आपल्याला तुरुंग देखील होऊ शकते.

सर्व पहा

चांदणीच्या फुलांचा साधा आणि प्रभावी हा उपाय जीवनात शांती आणि सकारात्मकता आणेल

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

नाचणी ढोकळा रेसिपी; वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम नाश्ता Finger millet Dhokla

बाजारातील भेसळयुक्त मध वापरणे सोडा: फक्त ३ घटकांपासून घरीच बनवा शुद्ध 'व्हीगन मध'

सर्व पहा

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलचे संपूर्ण कुटुंब या खुनी कटात सहभागी? केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना संशय

रशिया-युक्रेन युद्धावर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार! ट्रम्प यांनी या देशांना इशारा दिला

आठवा वेतन आयोग: पगारात किती वाढ होणार? महागाई भत्ता (DA) विलीनीकरण, फिटमेंट फॅक्टर आणि घरभाडे भत्ता (HRA)यावरील प्रमुख अपडेट्स वाचा

महाराष्ट्रातील दुष्काळावरून राजकारण तापले, महाविकास आघाडीचे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार?

'वंदे मातरम न गायल्याबद्दल शिक्षा नाही': सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर मागितले, संपूर्ण गीत गाणे अनिवार्य आहे का?

पुढील लेख