Festival Posters

जिओ मार्ट अ‍ॅप लाँच, सामान खरेदीवर एमआरपीपेक्षा पाच टक्के सवलत

Updated: शनिवार, 25 जुलै 2020 (10:17 IST)
 
200 शहरांमध्ये कंपनीने आपली ही सेवा सुरू केली आहे. सध्या JioMart वर किराणा सामान, पर्सनल केअर, होम केअर आणि बेबी केअर प्रोडक्ट्स ऑर्डर करता येतील. गुगल प्ले-स्टोअरवर याच्या अँड्रॉइड व्हर्जनची साइज 13 एमबी आणि अ‍ॅपल स्टोअर iOS व्हर्जनची साइज 30.7 एमबी आहे. गुगल प्ले स्टोअरवर लाँच झाल्यापासून एक लाखांहून जास्त जणांनी हे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे.
 
JioMartवर किराणा सामानाच्या खरेदीवर व अन्य अत्यावश्यक सामानावर एमआरपीपेक्षा पाच टक्के सवलत दिली जात आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी झोमॅटो किंवा या क्षेत्रातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा कमी दरात जिओ मार्टवरुन सामान खरेदी करता येईल असा कंपनीचा दावा आहे. तसेच, किमान रक्कमेच्या खरेदीची कोणतीही अट न ठेवता कंपनीकडून सामानाची फ्री डिलिव्हरी दिली जाईल.
 
JioMartचा वापर अ‍ॅपऐवजी जर वेबसाइटवर करायचा असेल सर्वात प्रथम  जिओ मार्टच्या https://www.jiomart.com/ या संकेतस्थळावर जावं लागेल. वेबसाइटवर गेल्यानंतर समोरच एक बॉक्स येईल. त्यामध्ये  एरियाचा पिन कोड टाकावा लागेल. क्षेत्र ग्रीन झोनमध्ये असेल तर तुम्हाला जिओ मार्टची डिलिव्हरी घरपोच मिळेल.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: दिशा सालियन प्रकरणात मोठा वळण: CBI कडून FIR दाखल

नागपूरमध्ये सणासुदीच्या काळात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या वापरावर बंदी

ठाण्यातील ४५ हजार भाविकांसाठी मोठी खुशखबर; आपल्या गावी जाण्यासाठी मोफत एसटी बस सेवा

मोहम्मद शमीचा भाऊ मोहम्मद कैफ याच्यावर बलात्काराचा आरोप

बंगळूरमधील ९० रुग्णालयांना कर्करोगाची बनावट औषधे पुरवली जात असून, ५ कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला

पुढील लेख
Show comments