Dharma Sangrah
✕

Net Speed increase :नेट स्पीड वाढविण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Updated: शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (11:29 IST)
 
1 अॅप्सचा पार्श्वभूमी वापर बंद करा
आपल्या मोबाईलमध्ये असे अनेक अॅप्स आहेत जे आपण चालवत नाही, तरीही ते आपला मोबाईल डेटा वापरत राहतात आणि आपल्याला माहितही नसते. हे तपासण्यासाठी, Settings मध्ये Data usage वर जा आणि कोणते अॅप अधिक डेटा वापरत आहे ते पहा. यानंतर, त्या अॅपचा बॅकग्राउंड वापर बंद करा जेणेकरून तुम्ही ते अॅप चालवताना मोबाइल डेटा वापरू शकेल.
 
2 निरुपयोगी अॅप्स काढा-
 वापरत नसलेले अ‍ॅप्स अनइंस्टॉल करा , कारण त्या अ‍ॅप्सचा मोबाइलमध्ये काही उपयोग नाही आणि ते अ‍ॅप्स मोबाइल डेटाही वापरतात, त्यामुळे  नेटला चांगली  स्पीड मिळत नाही. नको असलेल्या  अॅप्स काढून टाका.
 
3 कॅशे साफ करा-
 नेट वापरताना वेबपेजची माहिती कॅशे मेमरीमध्ये सेव्ह होते. या कारणास्तव, मोबाइलमध्ये भरपूर कॅशे डेटा साचलेला असतो, आणि मोबाइल इंटरनेटचा वेग देखील कमी होतो. त्यामुळे वेळोवेळी कॅशे साफ करत रहा. कॅशे साफ केल्याने इंटरनेट स्पीड वाढते. 
 
4 ब्राउझर अपडेट करा-
आमचा ब्राउझर अप टू डेट नसेल तर चांगल्या इंटरनेट स्पीडची अपेक्षा अशक्य आहे सर्व प्रथम मोबाइल ब्राउझर अपडेट करा. कारण जुन्या ब्राउझरमध्ये काही उणीवा आणि Errors असतात, ज्या नवीन अपडेटमध्ये सुधारित असतात . ब्राउझर अपडेट केल्या नंतर इंटरनेट स्पीडमध्ये सुधारणा होते.
 
5 रॅम साफ करा-
मोबाइलमधील सर्व अॅप्स सर्व मोबाइल डेटा वापरतात. त्यामुळे मोबाईलच्या वेगवेगळ्या अॅप्स डेटाचा वापर केल्यावर ब्राउझरला कमी डेटा मिळतो, त्यामुळे  इंटरनेटची स्पीडही कमी होऊ लागतो. त्यामुळे मोबाईलची रॅम (रँडम अ‍ॅक्सेस मेमरी) वेळोवेळी क्लिअर करावी. असं केल्याने वापरत असलेल्या अॅपला सर्व मोबाईल डेटा मिळेल.

Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

राहुल गांधी घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता नष्ट करण्याचा कट रचत आहेत’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

LIVE: आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल ट्रेन सेवा १४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बंद

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

आसनगाव-कसारा दरम्यानची लोकल ट्रेन सेवा १४ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बंद

दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांना निलंबित करण्याची धमकीचा अडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments