Daily Horoscope
✕

लोकसभेसाठी ठाकरे गटाची घोडदौड, 11 उमेदवार ठरले

Updated: शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:48 IST)
 
त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे.
 
ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार
    शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे
    बुलढाणा - नरेंद्र खेडेकर
    ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील
    रायगड - अनंत गीते
    रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
    दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
    वायव्य मुंबई - अमोल कीर्तीकर
    संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
    धाराशिव - ओमराजे निंबाळकर
    परभणी - संजय जाधव
    ठाणे - राजन विचारे
 
आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांची मागणी केली आहे. या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून 11 जागांवर नावं फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचं दिसून येतंय.

Edited By -  Ratnadeep ranshoor
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

गोलकीपरशी धडक झाल्याने स्ट्रायकर जीझस डी मिगेलचा मृत्यू

LIVE: अजिबात काळजी करू नाका; पंतप्रधान मोदींनी मराठीतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले

प्रवाशांनो लक्ष द्या! दिवाळी आणि छठच्या दिवशी दिल्लीसह या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहील

रशियाने युक्रेनमध्ये हल्ले करून २६ जणांना ठार केले; झेलेन्स्की यांचे गंभीर आरोप

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ४२ वर्षांनंतर मोठी उलथापालथ: शिंदे यांचे मंत्री शंभूराज देसाई विजयी

पुढील लेख
Show comments