suvichar
✕

मुलगी म्हणजे आयुष्याचं सोनं : Daughter’s Day विशेष

Updated: सोमवार, 29 सप्टेंबर 2025 (11:47 IST)
पालकांचं प्रेम व्यक्त करणे : आई-वडिलांनी आपल्या मुलीला ती किती खास आहे हे सांगण्यासाठी आणि तिच्या यशाचा अभिमान व्यक्त करण्यासाठी.
स्त्रीशक्तीचा गौरव : मुलगी ही भविष्यात आई, बहिण, पत्नी, मैत्रीण अशा अनेक रूपांमध्ये प्रेम, काळजी आणि सामर्थ्याचं प्रतीक बनते. तिच्या या बहुरंगी अस्तित्वाचा सन्मान करण्यासाठी.
समाजातील चुकीच्या समजुती दूर करणे : अजूनही काही ठिकाणी मुलगी जन्माला येणं नकोसं मानलं जातं. डॉटर’स डे हा दिवस त्या चुकीच्या मानसिकतेला बदलून “मुलगी म्हणजे देवाची देणगी” हे पटवून देतो.
 
मुलगी का खास असते?
ती घराची लाडकी गोड गोजिरी फुलासारखी असते
तिचं हसणं घरात आनंद पसरवतं
ती मोठी होऊन कधी जबाबदार मुलगी, कधी कर्तृत्ववान महिला, तर कधी आई म्हणून जगाला दिशा देते
मुलगी म्हणजे ममता, जिद्द आणि प्रेमाचा अद्भुत संगम
 
डॉटर्स डे कसा साजरा करावा?
आपल्या मुलीला मिठी मारून तिच्यावरचं प्रेम व्यक्त करा
तिला आवडणारी छोटीशी गिफ्ट द्या किंवा तिला तिचं आवडतं जेवण बनवून द्या
तिच्या यशाचा सन्मान करा आणि तिच्या स्वप्नांना पाठबळ द्या
तिच्याबरोबर वेळ घालवा आणि तिला तुमच्यासाठी ती किती खास आहे हे सांगा
 
भावनात्मक संदेश
मुलगी ही फक्त अपत्य नाही, ती देवाने दिलेली अनमोल देणगी आहे.
आई-वडिलांसाठी ती अभिमानाची ओळख आणि जीवनाचा श्वास आहे.
म्हणूनच डॉटर्स डे हा दिवस तिचं अस्तित्व साजरं करण्यासाठी आणि तिला सांगण्यासाठी असतो की –
"तू आमच्यासाठी जगातली सर्वात सुंदर देणगी आहेस!"
ALSO READ: National Daughters Day 2025 wishes : राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा मराठी

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार

थोरले माधवराव पेशवे पुण्यतिथी विशेष : पानिपतच्या पराभवातून मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणारा कर्तबगार पेशवा

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

गायीला वाचवताना अपघातात प्रसिद्ध कवयित्री जागीच ठार

मुंब्रामध्ये मिठाई खाल्ल्यानंतर पाच जण आजारी पडले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू ; FDA ने मिठाईचे दुकान बंद केले

पुढील लेख
Show comments