Dharma Sangrah

राज ठाकरे यांच्या मनसेची लगीनघाई ५०० जोडप्यांच करणार शुभमंगल

शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (09:09 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे. अमित यांचे लग्न फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी लग्नाची गाठ बांधली गेली. ठाकरे कुटुंबीयांच्या या लग्नसोहळ्याला दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, यांसह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेतेही अमित यांच्या विवाहाला हजार होते. आता लग्नानंतरही राज यांच्या घरी लगीनघाई असल्याचे दिसून येते आहे. राज ठाकरे 500 आदिवासी मुला-मुलींच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार असून मनसेकडून हा लग्नसोहळा आयोजित केला आहे. पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर, आदिवासी परिसरातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची प्रमुख उपस्थिती असणार असून, अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती मनसेने दिली आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात हा सामुदायिक विवाहसोहळा शनिवार 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. घर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या विवाहसोहळ्याचे आयोजन केले आहे. अमित ठाकरेंचा विवाहसोहळ 27 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली होती. आता सामाजिक दायित्व म्हणून मनसे हा सोहळा करत    आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

मुंबई पावसाने ठप्प! महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

महाराष्ट्र टीईटी परीक्षा पुढील वर्षापासून ऑनलाइन होणार, पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा विनाशुल्क होणार

LIVE: ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३०० कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या

एसटी बसेसना तोटा होत राहिल्यास नोकऱ्या जातील! प्रताप सरनाईक यांनी आळशी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला

पंढरपूर विकास योजना: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय, विठ्ठल नगरीचा कायापालट करणार!

पुढील लेख
Show comments