Marathi Biodata Maker

OMG! रेस्टॉरंटमध्ये अचानक प्लेटहून चालू लागला ‘Zombie’ चिकन, VIDEO Viral

Updated: मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (11:42 IST)
 
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 कोटी 44 लाखाहून अधिक वेळा बघितला गेला आहे आणि सुमारे 2 लाख 80 हजाराहून अधिक वेळा शेअर करण्यात आला आहे. आता प्रश्न हा आहे की व्हिडिओ फेक आहे वा रिअल.
 
फ्लोरिडा येथील राहणार्‍या रे फिलिप्स यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओत आपण एका रेस्टॉरंटच्या टेबलवर एका डिशमध्ये रॉ चिकनचे काही पीस ठेवलेले बघू शकता. अचानक त्यापैकी एक पीस हालताना दिसत आणि नंतर डिशहून जंप करून टेबलाहून खाली पडतं.
 
बघा व्हिडिओ-
 
व्हिडिओ कुठल्या रेस्टॉरंटमधला आहे हे स्पष्ट झालेले नाही परंतू चॉपस्टिक्स बघून हे एखाद्या जपानी, चीनी किंवा कोरियन रेस्टॉरंटचं असल्याचा अंदाज बांधता येईल.
 
हा व्हिडिओ काही लोकं फेक असल्याचं म्हणत आहे तर काही लोकांप्रमाणे यातील पीस दोर्‍याला बांधून दोरा खेचण्यात आला असावा. काही लोकांप्रमाणे मीट फ्रेश असून फ्रेश मीट जलद गतीने हालतं. तर एकाने मीट बेडकाचं असल्याचं म्हटलं. बेडकाचं मीट अशियन देश जसे जपान, चीन इतर खाल्लं जातं. तर एकाने लिहिले की मीट इतकं फ्रेश आहे की मसल्स अजून देखील हालचाल करत आहे. उल्लेखनीय आहे की डोकं कापल्यानंतरही चिकन जिंवत राहण्यास सक्षम असतं.

काय आहे सत्य?
 
प्रसिद्ध साइंस मॅगझिन ‘साइंटिफिक अमेरिकन’ नुसार, ताज्या मीटच्या तुकड्यांमध्ये न्यूरॉन अॅक्टिव्ह असतात, हे सोडियम आयनसोबत रिअॅक्ट करतात. मीठ आणि सोया सॉसमध्ये हे केमिकल कंपाउंड आढळतात. मीटमध्ये मीठ आणि सोया सॉस मिसळल्यावर न्यूरॉन रिअॅक्ट करतात. यामुळे मीटच्या तुकड्यांमध्ये जीव असून ते चालतात असं वाटतं.
 
‘साइंटिफिक अमेरिकन’ ने या व्हायरल व्हिडिओवर म्हटले की “जीव मृत झाल्यावर देखील त्याच्या शरीरात आढळणारे न्यूरॉन लगेच काम करणे बंद करत नसतात. त्यांच्यात काही तास तरी प्रतिक्रिया देण्याची क्षमता असते. विशेषकरून तेव्हा जेव्हा त्यात सोडियम आयन मिसळण्यात येतं. या प्रकरणात असेच काही घडले असावे.”

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क, 'एक विभाग, एक पोलीस' योजना

बदलापूरमध्ये शरद पवार गटाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

एसटीने दिलासादायक प्रवास पुरवला, एनसीएमसी कार्डची आवश्यकता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली

संचेती चौकात दुचाकीस्वाराने केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला धडक दिली, एफआयआर दाखल

रेडमी नोट 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्स वर 5,000ची सूट, 10,000mAh बॅटरी आणि 3,500 निट्सचा डिस्प्ले: स्वस्त स्मार्टफोन्सनी खळबळ उडवली

पुढील लेख
Show comments