suvichar

देशात आचारसंहिता लागू; 7 एप्रिल ते 12 मे दरम्यान मतदान

Written By WD
Updated: गुरूवार, 6 मार्च 2014 (10:52 IST)
 
10 एप्रिलला तिस-या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, रामटेक, नागपूर, भंडारा-गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली,  यवतमाळ आदी 10 मतदारसंघात मतदान होईल.
 
17 एप्रिलला पाचव्या टप्प्यात हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 19 लोकसभा मतदारसंघात मतदान होईल.
 
24 एप्रिल सहाव्या टप्प्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड इत्यादी 19 मतदारसंघात मतदान होईल.
 
यंदा प्रथमच सर्वाधिक 81 कोटी 40 लाख मतदार मतदान करणार आहेत. यंदा 10 कोटी मतदार वाढले आहेत. याचबरोबर यंदा 18 ते 35 वयोगटातील सर्वाधिक मतदार आहेत. 
 
नऊ टप्प्यांत होणा-या मतदानांसाठी एकूण 8 लाख मतदान केंद्रे असतील तर, 12 लाख मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ (नोटा) या बटणाचा पर्यायही मिळणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह त्याचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवले जाणार असल्याची माहिती संपथ यांनी दिली.
 
लोकसभा निवडणुकीची टप्पे: 
पहिला टप्पा: 7 एप्रिल, 2 राज्ये, 6 मतदारसंघ
दुसरा टप्पा: 9 एप्रिल, 5 राज्ये, 7 मतदारसंघ
तिसरा टप्पा: 10 एप्रिल, 14 राज्ये, 92 मतदारसंघ
चौथा टप्पा: 12 एप्रिल, 3 राज्ये, 5 मतदारसंघ
पाचवा टप्पा: 17 एप्रिल, 13 राज्ये, 122 मतदारसंघ
सहावा टप्पा: 24 एप्रिल, 12 राज्ये, 117 मतदारसंघ 
सातवा टप्पा: 30 एप्रिल, 9 राज्ये, 89 मतदारसंघ
आठवा टप्पा: 7 मे, 12 राज्ये, 64 मतदारसंघ
नववा टप्पा: 12 मे, 3 राज्ये, 41 मतदारसंघ 
मतमोजणी: 16 मे ला (देशभरातील सर्व 545 मतदारसंघाची)

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

जपानमध्ये निसर्गाचा प्रकोप; ७.१ तीव्रतेच्या भूकंपानंतर मोठा मॉल कोसळला

अमरावतीमध्ये बनावट शिधापत्रिका रद्द, मिशन सुधार अभियानांतर्गत मोठी कारवाई

ETPL 2026 full schedule : नवीन टी२० लीगचे वेळापत्रक जाहीर झाले असून संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

पहिल्यांदाच आरोग्य विमा घेत आहात का? तर तुम्ही या ४ गोष्टी समजून घेतल्या पाहिजे

Show comments