हा चित्रपट अगदी वेगळा असून यातील नायक वळू हाच आहे. मोकाट सुटलेल्या झपाटलेल्या बैलास पकडण्याचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. या वळूला पक़डण्याच्या प्रयत्नात अतुल कुलकर्ण ी, डॉ. मोहन आगाश े, दिलीप प्रभावळक र, भारती आचरेक र, गिरीश कुलकर्ण ी, निर्मिती सावंत हे बडे कलावंत सामील झाले आहेत.
अंटार्क्टिक फिल्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश धाकडे यांनी चित्रपटास संगीत दिले आहे. मुक्ता आर्ट्सने या चित्रपटाचे हक्क विकत घेऊन यातून मराठी चित्रपटांप्रती बांधिलकी स्पष्ट केली आहे.
उमेश कुलकर्णी या तरूण दिग्दर्शकाचा 'वळू' हा पहिलाच चित्रपट असून त्याची निर्मितीमुल्ये उच्च दर्जाची आहेत.
मुक्ता आर्ट्सने यापूर्वी च 'कांदा पोह े' या मराठी चित्रपटाची निर्मिती हाती घेतली आहे. सावरखेड एक गावचे दिग्दर्शक राजीव पाटील हेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. निर्माता श्रेयस तळपदे आहे. कांदा पोहे मध्ये शिल्पा तुळसक र, तुषार दळवी व सुबोध भावे हे कलावंत आहेत.
IFM
IFM
सुभाष घईंची संपूर्ण कारकीर्द महाराष्ट्रात घडली आहे. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले क ी, या महाराष्ट्राच्या ऋणातून मुक्त होण्याच्या भावनेतून आपण मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे योगदान देत आहोत. त्यादृष्टीने मुक्ता आर्ट्सचे हे पहिले पाऊल असून यापुढेही नवीन प्रतिभेस वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहु. उमेश कुलकर्णी या तरूण दिग्दर्शकाचा 'वळ ू' हा पहिलाच चित्रपट असून त्याची निर्मितीमुल्ये उच्च दर्जाची आहेत. यातून चित्रपटसृष्टीतील तरूण प्रतिभेचे दर्शन घडत असून मुक्ता आर्टस तरूण प्रतिभेस वाव देण्यासाठी वचनबद्ध आहे.
दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त करताना मुक्ता आर्ट्सच्या बॅनरअंतर्गत चित्रपटाची दृष्यात्मकता ठळक होण्याबाबत विश्वास व्यक्त केला. यामुळे आपणांस दुसर्या प्रकल्पाकडे लक्ष देण्यास निश्चितच वेळ मिळेल. याचबरोबर मुक्ता आर्टससारख्या चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठा असलेल्या संस्थेमुळे चित्रपट सर्व स्तरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचे ल, याबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More