Festival Posters
✕

स्वच्छतेचे महत्व मनामनात ठसवणारा चित्रपट ‘अवकारीका’ लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Updated: सोमवार, 30 जून 2025 (16:47 IST)
 
चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली, त्या वेळी  या सिनेमाचे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव, भारत टिळेकर, डीओपी करण तांदळे, संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे, अभिनेता रोहित पवार, लाईन प्रोड्यूसर चेतन परदेशी, असोसिएट दिग्दर्शक रहेमान आदी उपस्थित होते. 
 
दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून सिनेमाची थीम डोक्यात घोळत होती. स्वच्छता हा विषय पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे. आजही देशात एकीकडे स्वच्छतेसंदर्भात आपल्याला मोठे काम करावे लागणार आहे, तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याकडेही आपल्याला एका व्यापक दृष्टिकोनातून पहावे लागणार आहे. कचरा वेचणारे आले की आपण कचरेवाला किंवा कचरेवाली आली असे म्हणतो. परंतु तसे न म्हणता स्वच्छता करणारे आले, असे म्हणण्याची गरज आहे. याचाच अर्थ आपल्याला आपल्या मनात असलेला कचरा किंवा जळमटे काढून फेकण्यास बाध्य करणारा हा सिनेमा आहे. शिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांना समाजात वावरताना किंवा दैनंदिन जीवनात खूपच संघर्ष करावा लागतो, त्याचेही चित्रण सिनेमात उत्तमरित्या केलेले आहे. 
 
ते पुढे म्हणाले की, सिनेमातील गीते अत्यंत अप्रतिम असून, बॉलिवूड चे दिग्गज गायक कैलाश खेर, सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गीतांना आवाज दिलेला आहे.  चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे दक्षिण भारतात तयार करण्यात आलेले असल्याने उत्कृष्ट कथानक आणि संगीताचा सुरेल मिलाफ असलेला ‘अवकारीका’ हा सिनेमा आहे.
 
या सिनेमाला अनेक दिग्गजांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सिनेमाच्या प्रोमोशनसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. 
 
चित्रपटात विराट मडके,राहुल फलटनकर,रोहित पवार ,डॉ नितीन लोंढे,प्रफुल्ल कांबळे,पंकज धुमाळ,विनोद खुरुंगळे ,पिया कोसुंबकर ,स्नेहा बालपांडे,वैभवी कुटे,उन्नती माने,कार्तिकी बट्टे यांच्या भूमिका असून ‘अवकारीका’ येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
चित्रपटातील स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे गाणे आज प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्याला कैलास खेर यांनी स्वरसाज चढवलेला आहे. यापूर्वी आलेल्या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन्ही गाणी रेडबड युट्यूब चॅनल वर आणि अन्य सोशल मीडियावर उपलब्ध असल्याचे अरविंद भोसले यांनी सांगितले.
ALSO READ: शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे खरे कारण समोर आले, शवविच्छेदन अहवालात हे उघड झाले
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

ये प्रेम मोल लिया’च्या निमित्ताने आयुष्मान खुरानाने साजरी केली पहिली छठ पूजा; अनुभवला खास क्षण

ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्यावर दुःखाचा डोंगर; पती जयंत मुखर्जी यांचे निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'ने ८ दिवसांत जगभरात १००० कोटींहून अधिक कमाई करत अनेक विक्रम मोडले

हैदराबादमधील अशी काही खास ठिकाणे, जी तुम्हाला परदेशात फिरत असल्याचा अनुभव देतील

सलमान खानच्या 'मातृभूमी' ट्रेलरने एका दिवसापेक्षा कमी वेळात ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments