Dharma Sangrah
✕

'F.U.- Friendship Unlimited' चा टीझर लाँच

Updated: सोमवार, 24 एप्रिल 2017 (18:28 IST)
 
नटसम्राट, ध्यानीमनी या आशयघन चित्रपटानंतर महेश मांजरेकर, तमाम तरुणाई चे प्रतिनिधित्व करणाऱ्या पात्रांचा आणि आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U  हा चित्रपट घेऊन येत आहेत. 
बॉलीवूड मधील कलाकारांबरोबरच फिल्म इंडस्ट्रीतील तगडे व्यावसायिक या चित्रपटाच्या  प्रदर्शनासाठी एकत्र आले आहेत, T.Series चे भूषण कुमार आणि किशन कुमार हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत त्यांची हि प्रसिद्ध संस्था या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करीत आहे, त्याचबरोबर बॉलीवूड मधील अनेक भव्य आणि मोठ्या बॅनर चे चित्रपट आणि बाहुबली या चित्रपटाचे वितरक अनिल थडानी F.U.चे वितरण करीत आहेत. भूषण कुमार आणि अनिल थडानी यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.
 
हा टीझर लाँच सोहळा गाजला तो कलाकारांच्या विशेष सादरीकरणाने. F.U. या चित्रपटातून मराठी चित्रसृष्टीत पदार्पण करणारे तरुण संगीतकार विशाल मिश्रा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल 'यूलिया' हिने बहारदार गाण्याचे सादरीकरण केले आणि त्यानंतर F.U. च्या धमाकेदार गाण्यावर आकाश ठोसर आणि सर्व तरुण कलाकारांनी नृत्याचा ठेका धरून सोहळ्याचा कळस गाठला.  
 
विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी अतिशय युथफूल आणि ठेका धरायला लावणारे संगीत दिले आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिजित देशपांडे यांच्या साथीने या चित्रपटाचे लेखन सुद्धा केले आहे. F.U. ची निर्मिती अभय गाडगीळ, महेश पटेल, दिनेश किरोडीयन आणि महेश मांजरेकर यांनी केली आहे. आजच्या तरुणाई ची भाषा बोलणारा F.U. - Friendship Unlimited हा भव्य चित्रपट येत्या २ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

पुढील लेख
Show comments