suvichar

निशाणी डावा अंगठा

Updated: शनिवार, 24 मे 2008 (11:57 IST)
शिक्षण क्षेत्रातील कारभारावर उपहासात्मक लिहिलेल्या 'निशाणी डावा अंगठा' या बुलढाण्याचे लेखक रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या कादंबरीवर प्रख्यात दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे चित्रपट बनवताहेत. उत्रादकर यांची ही कादंबरी गेल्या दोन वर्षांच चांगलीच चर्चेत झाली आहे. बेर्डे यांनी ही कादंबरी वाचली आणि त्यांना त्यावर चित्रपट बनवावासा वाटला. आता त्यावर काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे बेर्डे यांनी 'भस्म' या चित्रपटानंतर म्हणजे तब्बल बारा वर्षांनंतर चित्रपट दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे.

' काय द्याचं बोला?' ची पटकथा लिहिणारे अजित व प्रशांत दळवी यांनीही 'निशाणी'ची पटकथा लिहिली आहे. हे दोघेही मराठवाड्यातीलच असल्याने कादंबरीतील विषयाला आणि भाषेला तेच न्याय देऊ शकतील, असे वाटल्याने बेर्डे यांनी त्यांच्याकडे हे काम सोपवलं. या चित्रपटात अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मिलिंद शिंदे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, शशांक शेंडे ही मंडळी आहेत.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मकरंद अनासपुरे याने यात एक गाणं गायलं आहे. संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मकरंद चक्क गायलाय. त्यामुळे त्याचे गाणे पहाणे आणि ऐकणे हाही एक चांगला अनुभव ठरेल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

'स्पायडर मॅन' आणि मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये अडकला राजकुमार रावचा चित्रपट, निर्मात्यांनी 'प्रहार' पुढे ढकलला

मनोज मुंतशीर यांनी 'आदिपुरुष'बद्दल म्हटले, चित्रपटाचा बचाव करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती

इंदूरमधील ऐतिहासिक पंढरीनाथ मंदिर आणि आषाढी एकादशीची परंपरा

अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लूची लागण, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला

महाराष्ट्रातील 'धाकटी पंढरी' म्हणून ओळखली जाणारी अत्यंत प्रसिद्ध विठ्ठल मंदिरे

Show comments