Dharma Sangrah
✕

पंजाबी चित्रपटाचा मराठीत रिमेक

Updated: गुरूवार, 13 नोव्हेंबर 2008 (14:27 IST)
महाराष्ट्रातील जागृत शक्तीपीठांच्या महतीवर आधारित, हिंदीतील निर्माते-दिग्दर्शक ठाकूर तपस्वी, रवींद्र गायकवाड यांच्या साथीने ' आई तुझ्या चरणी माझा संसार' हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. ' माता दा दरबार' या पंजाबी चित्रपटाचा मराठी रिमेक असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुकादेवी, वणीची सप्तश्रृंगी आणि कार्ल्याची एकवीरादेवी या महाराष्ट्रातील जागृत शक्तीपीठांचे दर्शन घडणार आहे.

या चित्रपटाच्या भक्तीपर गीतांच्या ध्वनीफितीचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. ज्येष्ठ अभिनेते दारासिंग आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या सोहळ्यास चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. या चित्रपटात आठ भावपूर्ण गीते आहेत. गीतकार सागर पवार यांनी ती लिहिली असून ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. उत्तरा केळकर, अजित कडकडे, आनंद शिंदे, साधना सरगम, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल या सुरेल गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

या ऑडिओ सीडीमध्ये भक्तीपर रचानांसोबत गोंधळ, आरती, लावणी, जोगवा अशा वैविध्यपूर्ण गीतांचा रसिक श्रोत्यांना आस्वाद घेता येणार आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा-दिग्दर्शक ठाकूर तपस्वी यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे महा‍सचिव आणि हिंदीतील निर्माते-दिग्दर्शक ठाकूर तपस्वी यांच्या देवीच्या श्रद्धेचे माहात्म्य सांगणार्‍या या चित्रपटात शशांक उदापुरकर, निशा परुळेकर, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, विजय चव्हाण, मेघा घाडगे, मुग्धा शहा, प्रमोद नलावडे, रुपांजली माने, तेजश्री, हनुमान या मराठी कलावंतांनी महत्तवपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

Show comments