Biodata Maker marathi
✕

सचिनचा 'आम्ही सातपुते'

Updated: बुधवार, 16 एप्रिल 2008 (14:23 IST)
' नवरा माझा नवसाचा' नंतर सचिन पिळगावकर 'आम्ही सातपुते' हा नवा कोरा करकरीत चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. याच महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटावर आधारीत असल्याची चर्चा आहे. त्याची कथाही काहीशी तशीच आहे. सचिन यांनीही 'सत्ते पे सत्ता' मध्ये काम केले होते. पण त्यांनी हा चित्रपट 'सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स' या मूळ इंग्रजी चित्रपटावरून प्रेरीत असल्याचे म्हटले आहे.

पण याची कथा 'सत्ते पे सत्ता' शी मिळती जुळती आहे. ती अशी- पूर्णा (सुप्रिया) एक अनाथ मुलगी आहे. तिला अण्णा (अशोक सराफ) आपली मुलगी मानून ते सांभाळतात. अण्णांना स्वतःच्याही सहा मुली असतात. अण्णांची खानावळ आहे. पूर्णा अण्णांच्या किचनचा ताबा घेते. किचनमधील सगळं व्यवस्थापन ती घेते. भाज्यांपासून स्वयंपाकापर्यंत सारं काही ती बघते. सहाजिकच तिच्यामुळे खानावळीचा दर्जाही वाढतो. पूर्णाची अन्नपूर्णा होते.

PR
कांद्या ( सचिन) हा अण्णांच्या खानावळीला भाज्या पुरवत असतो. रोजच्या व्यवहाराच्या निमित्ताने कांद्या आणि पूर्णाचा संबंध येतो आणि दोघे विवाहबद्धही होतात. लग्नानंतर पूर्णाची भेट होते ती कांद्याच्या सहा भावांशी. हे सहा भाऊ म्हणजे अर्क आहेत. कुठलेही संस्कार त्यांच्यावर नाहीत. एकमेकांशी लबाडी करणे आणि परस्परांवर कुरघोडी करणे हा त्यांचा उद्योग. या सहा भावांची नावे अशी- बटाट्या (केदार), तांब्या (नयन), कोब्या (आनंदा), हरभर्‍या (वृषसेन), दोडक्या( सचिन कुलकर्णी) आणि सर्वांत लहान चिंगळ्या (स्वप्निल)

कांद्याचे एकेक दिव्य भाऊ पाहून सटपटलेली पूर्णा अखेर त्यांना शिस्त लावायला पहाते. त्यासाठी कठोर उपाययोजना करते. एकेकाला चांगलेच सरळ करते. संस्कारहीन मुलांवर ती योग्य संस्कार करून त्यांना चांगल्या घरातली मुले अशी ओळख मिळवून देते. संतापी भावांना रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करावे याचे धडेही देते.

पुढे काय होते, योगायोगाने या भावांची भेट पूर्णाच्या सहा बहिणींशी होते. आणि ते सगळे त्यांच्या प्रेमात पडतात. आता काय करायचं? कांद्या एक शक्कल लढवतो आणि त्या सहा बहिणींचे अपहरण करण्याची योजना आखतो. अण्णांना पत्ता न लागू देता तो हा प्लॅन आखतो.

हा प्लॅन काय असतो? कांद्याचे भाऊ पूर्णाच्या बहिणीचे प्रेम मिळविण्यात यशस्वी होतात का? पूर्णा याला संमती देते का? अण्णांना हे मान्य होते का? या सगळ्यांचा शेवट गो़ड होतो का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'आम्ही सातपुते' बघायला पाहिजे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

बिहारी महिला आणि छठ-सिंदूरवर टिप्पणी केल्याप्रकरणी कॉमेडियनविरोधात एफआयआर दाखल

Boating Spots in Maharashtra नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी प्रमुख आणि निसर्गरम्य स्पॉट्स

अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा धमकी; 'जलसा' उडवून देण्याचा इशारा

लाल साडी, महाराष्ट्रीयन नथ आणि गजरा... श्रद्धा कपूर अंबाबाई मंदिरात दर्शनाला

'हनुमान अंश'च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर; दोन प्लॅटफॉर्मवर सहा भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार

Show comments