Daily Horoscope
✕

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध 'हॉन्टेड' ठिकाणांपैकी एक मुकेश मिल्स; अनेक कलाकार आणि क्रू मेंबर्सनी येथे भीतीदायक अनुभव आल्याचे सांगितले

Updated: बुधवार, 6 मे 2026 (16:50 IST)
मुकेश मिल्स ही मुंबईतील सर्वात 'हॉन्टेड' ठिकाणांपैकी एक मानली जाते. ही मिल १८७० च्या दशकात सुरू झाली होती, पण १९८० मध्ये लागलेल्या एका भीषण आगीनंतर ती बंद पडली. तेव्हापासून ही इमारत ओसाड आहे. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण असले तरी, अनेक कलाकार आणि क्रू मेंबर्सनी येथे भीतीदायक अनुभव आल्याचे सांगितले आहे. ओसाड पडलेल्या भिंती, तुटलेली छपरे आणि तिथली शांतता यामुळे हे ठिकाण खूपच गूढ वाटते.
ALSO READ: Haunted places In India आजही लोक तिथे जाण्यास घाबरतात; जिथे सूर्यास्तानंतर थांबण्यास परवानगी नाही
मुकेश मिल्स ही मुंबईतील कुलाबा भागातील समुद्रकिनारी असलेली एक जुनी, आता भग्नावस्थेत असलेली कापड गिरणी आहे. हे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध 'हॉन्टेड' ठिकाणांपैकी एक मानले जाते, पण बॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीही हे एक लोकप्रिय ठिकाण राहिले आहे.

इतिहास-
१८७० च्या दशकात बांधलेली तसेच काही स्रोतांनुसार १८५० ते १९०० च्या दरम्यान ही दक्षिण मुंबईतील एकमेव गिरणी होती आणि समुद्राच्या जवळ असल्यामुळे कापूस व कापड व्यापारासाठी सोयीस्कर होती.
साधारण १९८२ मध्ये, येथे भीषण आग लागली, ज्यात अनेक गिरणी कामगारांचा मृत्यू झाला. त्यानंतर गिरणी बंद झाली. तसेच असे सांगण्यात येते की, शॉर्ट सर्किट किंवा अज्ञात कारणामुळे ही आग लागली. सुमारे २००० साली गिरणी पूर्णपणे बंद झाली. ही ब्रिटिशकालीन सर्वात जुन्या गिरण्यांपैकी एक होती जी नंतर बंद झाली.

मुकेश मिल्स प्रसिद्ध का आहे?
'ओम शांती ओम', 'भूत' आणि इतर अनेक चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि फॅशन शूटसाठी मुकेश मिल्सचा वापर केला गेला. त्याच्या पडक्या कमानीच्या खिडक्या, समुद्राचे दृश्य आणि जुन्या भिंतींमुळे एक सिनेमॅटिक अनुभव येतो. सूर्यास्तानंतर सहसा चित्रीकरण टाळले जाते.
ALSO READ: कमी बजेटमध्ये 2 दिवसांची ट्रिप कुठे प्लॅन कराल?
तसेच आगीत ठार झालेल्या कामगारांचे आत्मे मुकेश मिल्स इथे आजून आहे अश्या  अफवा सामान्य आहे. लोकांना विचित्र आवाज, पावलांचे आवाज, सावल्या आणि विचित्र घटना ऐकू येतात. स्थानिक लोक रात्री किंवा एकटे भेट देण्यास घाबरतात. अनेक भयकथा यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्या आहे.

२०१९ मध्ये, बीएमसीने इमारतीच्या संरचनात्मक कमकुवतपणामुळे ते बंद केले. आता चित्रीकरणास मनाई आहे. समुद्राच्या जवळ असल्यामुळे हे ठिकाण सुंदर आहे, परंतु ते धोकादायक देखील आहे.

ही गिरणी तिच्या पडक्या इमारती आणि गूढ वातावरणामुळे चित्रपट चित्रीकरणासाठी खूप प्रसिद्ध आहे, पण तितकीच ती तिथल्या कथित 'हॉन्टेड' कथांमुळेही चर्चेत असते.
ALSO READ: मुंबई-पुण्याजवळच्या 'या' ५ जागा, जिथे तुम्ही एका दिवसात पिकनिक करून परत येऊ शकता
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

यामी गौतम 'नयी नवेली'मध्ये एका अनोख्या अवतारात दिसणार, ज्यात तिने 'मोहिनी'ची खास शैली साकारली

अंबाजी, पावागड आणि बहुचराजी; गुजरातमधील प्रसिद्ध देवी मंदिरांची दर्शन सहल

डोळ्यात अश्रू दाटून आले पण विद्युत जामवाल २० मिनिटे पापणीही न मिटवता उभा राहिला, व्हिडीओ हायरल

खलनायकापासून सुपरस्टारपर्यंतचा प्रवास; विनोद खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांनाही दिली होती कडवी टक्कर

राजपाल यादव यांच्या अडचणी वाढल्या, सर्वोच्च न्यायालय म्हणाले 'तुरुंग हेच योग्य ठिकाण,' २ कोटी जमा करण्याची शेवटची संधी

पुढील लेख
Show comments